Manoj Jarange patil: 'मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा अन्यथा...', सकल मराठा समाजाचा एकनाथ शिंदेंना इशारा

Manoj jarange patil hunger strike Warning to Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगेसोयरे बाबत अधिवेशनात निर्णय घेण्याचे मान्य केले होते.
Manoj jarange patil hunger strike
Manoj jarange patil hunger strike sarkarnama

Maratha Reservation : अंतरवली सराटी येथील मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाने मराठा समाज पुन्हा एकवटला आहे. नाशिक सकल मराठा समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात निर्णय घेण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे.

जरांगे पाटील यांच्या सगे-सोयरे याबाबत तातडीने अध्यादेश काढण्यात यावा. मराठा आरक्षणाच्या मागणीतील अडथळे सरकारने दूर करावे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आश्वासन दिले होते. ते न पाळल्यास सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देता वेळी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी नाना बच्छाव, चंद्रकांत बनकर, अखिल भारतीय मराठा महासंघाचे शहर अध्यक्ष संजय फडोळ, राम निकम, रमेश खापरे पाटील, गणेश खोपडे, गणेश पाटील, ज्ञानेश्वर कवडे, राजेंद्र शेळके यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

Manoj jarange patil hunger strike
Manoj Jarange: मनोज जरागेंची प्रकृती खालावली; मराठा समाज आक्रमक;... रस्त्यावर उतरणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde आणि राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी सगेसोयरे बाबत अधिवेशनात निर्णय घेण्याचे मान्य केले होते. याबाबत चर्चेत विविध आश्वासन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आले होते मात्र त्यानंतर राज्य सरकारने यावर निर्णय घेतला नसल्याने मराठा समाज संतप्त झाला आहे.

आमदार-खासदार जरांगे पाटलांच्या भेटीला

गेल्या पाच दिवसांपासून अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील Manoj Jarange यांनी आपल्या मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण झाला आहे. या उपोषणाचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. सरकारमधील काही आमदारांनी, खासदारांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.

(Edited By Roshan More)

Manoj jarange patil hunger strike
Raksha Khadase : राज्यमंत्री रक्षा खडसेंना वाटत होती धाकधूक, 'हे'आहे कारण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com