Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांच्या उपोषणावर नाशिकमधून आंदोलकांची "ही" मोठी घोषणा!

Manoj jarange Patil; Maratha reservation issue, followers warns government-सकल मराठा समाजातर्फे जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात प्रशासनाला अल्टिमेटम देण्यात आला.
Maratha delegation & Manoj Jaramge Patil
Maratha delegation & Manoj Jaramge PatilSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News: मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवेली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे राज्यभरातील समर्थक अस्वस्थ झाले आहेत. नाशिकमध्ये याबाबत राज्य शासनाला इशारा देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी नाशिक मध्ये मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निवेदन देखील देण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांच्या सध्या सुरू असलेल्या उपोषणाला राज्य शासनाने राजकीय वळण देऊ नये.

शासनाने यापूर्वीच विविध आश्वासने दिली होती. त्यांची तातडीने अंमलबजावणी करावी. याबाबत शासन गांभीर्याने या प्रश्नाकडे पाहत नाही. त्यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे. राज्य शासनाने येत्या दोन दिवसात या प्रश्नावर ठोस कार्यवाही करावी, असा अल्टिमेटम सकल मराठा समाजातर्फे देण्यात आला आहे

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यांना यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची तातडीने पूर्तता करावी. तसे न झाल्यास मराठा समाजातर्फे शासनाच्या निषेधार्थ आंदोलन होईल.

Maratha delegation & Manoj Jaramge Patil
Narendra Darade Politics: धक्कादायक, आमदार दराडेंवर गुन्हा दाखल, भुजबळ- दराडे राजकीय संघर्षाचा नवा अंक?

या संदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मागण्या मान्य करण्यात याव्यात, अन्यथा दोन दिवसांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयासमोर निदर्शने केली जातील. महामार्गावर रस्ता रोको होईल. रेल्वे रोको आंदोलनाचा देखील इशारा देण्यात आला आहे.

जिल्हास्तरावर कार्यकर्ते आक्रमक आहेत. त्यातच नांदगाव येथे आज सकल मराठा समाजातर्फे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाचे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

गरजवंत मराठा समाजाला ५० टक्के मर्यादेत ओबीसी आरक्षण देण्यात यावे. मराठा हा कुणबी आहे. कुणबी हा ओबीसी आहे. त्यामुळे राज्य शासनाने प्रामाणिक भूमिका घेऊन आरक्षणाची मागणी पूर्ण करावी.

यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी वर्षभरापासून आंदोलन सुरू केले आहे. सहा वेळा उपोषण करण्यात आले आहे. त्यामुळे सध्याचे उपोषण हे आणीबाणीची स्थिती आहे.

मराठा समाजाची परीक्षा न घेता सगळे सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी. हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गव्हर्मेंट गॅझेट लागू करण्यात यावे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी यापूर्वी तीव्र आंदोलन झाले. त्यावेळी राज्यभर विविध कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले. हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, आदी मागण्यांचा पुनरूच्चार करण्यात आला.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com