Maratha Reservation: जखमींना भेटण्यासाठी जरांगे पाटील रात्री दीडला रुग्णालयात गेले!

Manoj Jarange Patil visits Nashik Hospital to see injured followers-मनोज जरांगे-पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या वेदना पाहून हळहळ व्यक्त करीत मदतीचे आश्वासन दिले
Manoj Jarange Patil in Hospital
Manoj Jarange Patil in HospitalSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : अंतरवाली सराटी (जालना) येथील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या येवला येथील कार्यक्रमात चार कार्यकर्ते जखमी झाले होते. यातील एकाला पाहण्यासाठी ते मध्यरात्री दीडला रुग्णालयात आले होते. (Jarange Patil visits with Amruta Pawar & Other Maratha community leaders)

मराठा आरक्षण (Maratha) आंदोलनाचे नेते, मनोज जरांगे -पाटील यांनी राज्य सरकार (Maharashtra Government) समाजाच्या अपेक्षा पूर्ण करील. मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) दिलेले आश्वासन ते कालावधी पूर्ण झाल्यावर नक्कीच पूर्ण करतील, असा विश्वास व्यक्त केला.

Manoj Jarange Patil in Hospital
Vijaykumar Gavit News : गावित हे तर स्वतःच्या कुटुंबाचे पालकमंत्री होते!

मनोज जरांगे-पाटील यांनी गेल्या आठवड्यात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला येथे सभा घेतली होती. या वेळी त्यांचे अतिशय उत्साही व मोठ्या प्रमाणात स्वागत झाले.

या स्वागताला काही कार्यकर्त्यांनी जेसीबी आणले होते. जेसीबीच्या बकेटमधून फुले उधळताना गर्दीत चार कार्यकर्ते पडून जखमी झाले. यातील एक कोपरगाव येथे उपचार घेत आहे. यातील विलास गाडे हा कार्यकर्ता अपोलो रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याला गोदावरी बँकेच्या अध्यक्षा अमृता पवार यांनी उपचारासाठी सत्तावन्न हजार रुपये साह्य केले होते.

जरांगे पाटील यांना या गाडे यांच्याविषयी माहिती मिळाल्यावर ते जालना येथून काही सहकाऱ्यांसह त्याची भेट घेण्यासाठी आले होते. मध्यरात्री दीडला त्यांनी त्याची विचारपूस केली. या वेळी जरांगे-पाटील यांनी मी तुमच्या वेदना वाया जाऊ देणार नाही. मराठा समाजातील गरीब, गरजू तसेच आयुष्यभर काबाडकष्ट करणारे शेतकरी अशा सर्व गरजूंना आरक्षणाची गरज आहेत. आरक्षण मिळेपर्यंत मी लढ्याची धग कमी होऊ देणार नाही, असे या कार्यकर्त्याला सांगितले.

Manoj Jarange Patil in Hospital
Maharashtra Loksabha Constituency : शिंदे गटाच्या तेरा खासदारांना मिळणार उमेदवारी, इतर मतदारसंघांत काय ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com