Manoj Jarange : भुजबळांचे समर्थक भिडले; मनोज जरांगे म्हणाले, 'मी चिल्लर चाळे करत नाही डायरेक्ट...'

Manoj Jarange Chhagan Bhujbal OBC Maratha: फडणवीससाहेब, अजितदादा यांचा हात त्यांच्या पाठीवर आहे. त्यामुळे ते गोरगरीब जनतेवर अन्याय करणारचं', असा टोला जरांगे पाटील यांनी भुजबळांचे नाव न घेता लगावला.
Manoj Jarange Patil & Chhagan Bhujbal
Manoj Jarange Patil & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange News: येवल्यामध्ये शिवसृष्टीला मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. या भेटीनंतर शिवसृष्टीबाहेर छगन भुजबळ यांचे समर्थक जमले होते. त्यांनी जरांगे पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर जरांगे पाटील यांचे समर्थकांनी देखील घोषणाबाजी करत प्रत्युत्तर दिले. दोन्ही गट घोषणाबाजी करत भिडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी इंदोर-पुणे मार्गावर रास्ता रोको केला. तेथे मनोज जरांगे पाटील यांनी रस्ता रोको मागे घेण्याचे आवाहन करत नाव न घेता छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर दिले.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, 'काय झालं हे मला माहीत नाही. पण असले चिल्लर चाळे करायची मला सवय नाही. मी डायरेक्ट भिडत असतो. आपला समज एक झाला आहे. आपली चूक नसली तरी ते म्हणतील आपली चूक आहे. मराठ्यांनी मोठं मन करायचं आहे. शांततेत आपण जायचं आहे.'

Manoj Jarange Patil & Chhagan Bhujbal
Baba Siddique Dead Updates: बाबा सिद्दीकी खून प्रकरणात पुण्यातून एक जण ताब्यात; मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई

'मराठ्यांचं मन मोठं आहे. त्यांच्याच्या सारखे आम्ही स्वार्थी संकुचित मनाचे नाही. एका मिनिटात आम्ही रस्ता मोकळा केला. फडणवीससाहेब, अजितदादा यांचा हात त्यांच्या पाठीवर आहे. त्यामुळे ते गोरगरीब जनतेवर अन्याय करणारचं', असा टोला देखील जरांगे पाटील यांनी भुजबळांचे नाव न घेता लगावला.

'लहान भाऊ मोठा भाऊ म्हणून आपण सांभाळून घ्यायचं. कारण गाव खेड्यात आपल्या राहायचं आहे. ज्यावेळी नरड्याला येईल त्यावेळी बघू. मनगटाला मनगट लागायचे असले तर तेव्हा बघू', असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला.

Manoj Jarange Patil & Chhagan Bhujbal
Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : येवल्यात राडा! मनोज जरांगे-छगन भुजबळ समर्थक भिडले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com