BJP News: अनेक बडे नेते रात्रीतून भाजपमध्‍ये दिसतील

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भाजप-शिंदे गट सर्व निवडणुका एकत्र लढणार
Chandrashekhar Bavankule With BJP leaders at Nandurbar.
Chandrashekhar Bavankule With BJP leaders at Nandurbar.Sarkarnama
Published on
Updated on

नंदुरबार : नंदुरबारसह (Nandurbar) राज्यातील (Maharashtra) प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था शिंदे गट (Eknath Shinde group) आणि भाजप (BJP) एकत्रितपणे लढणार आहे. राज्यातील सरकार जसे रात्रीतून बदलले तसेच काही बडे नेते रात्रीतून भाजपमध्ये आलेले दिसतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी केला. (BJP state president on Nandurbar district visit)

Chandrashekhar Bavankule With BJP leaders at Nandurbar.
Congress News: `फॉक्सकॉन`विषयी ९० टक्के चर्चा झाली होती!

श्री. बावनकुळे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, युवा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, आमदार राजेश पाडवी, डॉ. शशिकांत वाणी आदी उपस्थित होते.

Chandrashekhar Bavankule With BJP leaders at Nandurbar.
Nashik News: नाशिक झाले यूपी- बिहार, पोलिसांचा वचक संपला?

श्री. बावनकुळे म्हणाले, सध्याचे सरकार शिंदे-फडणवीस सरकारची बुलेट ट्रेन असून, जुने सरकार तीनचाकी रिक्षा होती. त्यामुळे विकासाच्या कामात निश्चितच फरक दिसेल. ‘‘राज्यातले विरोधी पक्षाचे नेते सत्ता गेल्याने बावचळले आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काहीच केले नसल्याने त्यांच्या आरोपांची दखल का घ्यावी? त्यांचे आरोप फक्त प्रसिद्धीसाठी आहेत. याकूब मेननच्या कबरीचे सुशोभीकरण हे उद्धव ठाकरे सरकारच्या काळातच झाल्याने त्यांनी जनतेची माफी मागावी.’’

नंदुरबार पालिकेसह जिल्ह्यातील सर्व पालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच आगामी सर्व निवडणुकांबाबत नंदुरबार जिल्ह्यातील भाजप व शिंदे गटात गेलेले नेते यांच्याशी चर्चा करून समन्वयाने याबाबत निर्णय घेण्यात येईल. आपापसांत असणारे मतभेद मिटवून एकत्र निवडणुका लढविल्या जातील, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

स्थानिक संस्था तसेच येणाऱ्या निवडणुकीत आम्ही ४५ प्लस खासदार, २०० प्लस आमदार आम्ही महाराष्ट्रात निवडून आणणार आहोत. पंतप्रधान गरीब कल्याण योजना गरजू लोकांना पोचल्या पाहिजेत. मधल्या काळात कोणत्याही योजनेचा लाभ पोचला नाही. प्रत्येक खात्याचा निधी त्यासाठीच संपूर्णपणे खर्च झाला पाहिजे. दुसऱ्या खात्याकडे वर्ग होता कामा नये याची काळजी घेतली जाईल. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये गांधीजींचा एकही विचार दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com