Good News : मुख्यमंत्र्यांनी केली आशा कर्मचाऱ्यांना सात हजारांची घसघशीत पगारवाढ!

Many leaders came forward as mediation for ASHA workers-अनेक नेत्यांनी हा संप मिटविण्यासाठी केली होती मध्यस्थी, ‘आशा’ कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला.
CM Eknath Shinde & CITU leaders
CM Eknath Shinde & CITU leadersSarkarnama

Maharashtra News : राज्यातील ७२ हजार आशा व गटप्रवर्तक त्यांच्या मागण्यासाठी १८ ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर होते. हा संप मिटविण्यासाठी विविध सत्ताधारी नेत्यांनी त्याबाबत पुढाकार घेतला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रमुख मागण्या सोडविल्याने ऐन दिवाळीतील हा संप मागे घेण्यात आला आहे.(Maharashtra Government came forward for ASHA workers deemands)

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसेच आरोग्य मंत्री तानाजी सावंत, (Tanaji Sawant) विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, (Narhari Zirwal) खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या पुढाकाराने वेळोवेळी चर्चा झाली. बुधवारी याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतला.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यासंदर्भात उपोषण, निदर्शने, जेलभरो आंदोलन सुरू होते. आशा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आरोग्य मंत्री सावंत तसेच अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसेकर यांच्याकडे चर्चा होऊन प्रमुख मागण्या मान्य झाल्या. त्यामुळे बेमुदत संप मागे घेण्याचा निर्णय कृती समितीने आज झालेल्या बैठकीत घेतला. दिवाळीपूर्वी झालेल्या बैठकीत संप मागे घेण्यात आला.

राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील आशा कृती समिती वतीने १८ ऑक्टोबरपासून सुरू केलेल्या या संपात ७२ हजार आशा व सुमारे साडेतीन हजार गटप्रवर्तक संपावर गेल्या होत्या .

संप काळात आरोग्यमंत्री सावंत यांनी आशा कर्मचाऱ्यांना सात हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना सहा हजार दोनशे रुपये वेतनवाढ केली. आशा व गटप्रवर्तकांना दोन हजार रुपये दिवाळी भेटदेखील देण्याचे जाहीर केले. गटप्रवर्तकांना आशा कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी वेतनवाढ केल्याने आणि कंत्राटी दर्जाबाबत कोणचताही निर्णय न केल्याने असंतोष होता. आता संप मागे घेण्यात आला आहे.

CM Eknath Shinde & CITU leaders
Maharashtra Politics : मालेगाव शहरात निहाल अहमद यांच्या जनता दलाचा राजकीय अस्त!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com