Chitra Wagh: `वरिष्ठ नेत्याने मला माझी जात विचारली होती`

नाशिक येथे अहीर सुवर्णकार समाज संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात चित्रा वाघ यांनी जातीला महत्त्व असल्याचे सांगितले.
BJP leader Chitra Wagh
BJP leader Chitra WaghSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : राजकारणात (Politics) जातीला (Cast) अतिशय महत्त्व (Importancs) असते. वरिष्ठ नेत्यांनी मला तुमची जात काय असे विचारले होते. त्यामुळे जातीला महत्त्व असते (Cast have importancs) याचा अनुभव आल्याचे नेत्या चित्रा वाघ यांनी सांगितले. (BJP leader Chitra Wagh says many have ask me my cast)

BJP leader Chitra Wagh
NMC : ‘हॅलो’ नव्हे ‘वंदे मातरम’ने करा सुरूवात; अतिरिक्त आयुक्त राम जोशींचे आवाहन...

येथील अहीर सुवर्णकार समाज संस्थेस (सोनारवाडा) १५५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

BJP leader Chitra Wagh
आंबेगावचा 'तो' व्हिडिओ थेट 'मातोश्री'वर...

चित्रा वाघ म्हणाल्या, की माझ्या राजकारणातील कारकिर्दीची सुरवात या संस्थेतूनच झाली आहे. या ठिकाणी मी अध्यक्षपद भूषविले आहे. सासुबाईंचे मला राजकारणात येण्यास पाठबळ मिळाले. असे सांगून त्यांनी राजकारणात जातीला अतिशय महत्त्व असल्याचे सांगितले. मीदेखील त्याचा अनुभव घेतला आहे. एका पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांने मला माझी जात विचारली होती. त्या वेळी उत्तर देताना मी त्या नेत्यास सांगितले की, आमची संख्या एव्हढी आहे की, आम्ही कान टोचल्याशिवाय कोणीही स्वतःला हिंदू मानत नाही.

त्या म्हणाल्या, याशिवाय माझ्या राजकीय जीवनात अनेकांनी जातीवरून मला घेरण्याचा प्रयत्न केला. माझी जात शोधण्याचा प्रयत्न झाला. मला व माझ्या कुटुंबीयांनादेखील त्रास देण्यात आला. माझे तोंड बंद करण्यासाठी माझ्या पतींना लक्ष्य केले गेले. या सर्वांना तोंड देत आज मी खंबीरपणे उभी आहे.

गावठाण विकासाशी संबंधीत उपस्थित केलेल्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही सौ. वाघ यांनी आश्वासन दिले. यावेळी त्यांच्या हस्ते सोनार वाड्यातील वामनशेठ दामोदरशेठ दुसाने नूतन सभागृहाचा लोकार्पण सोहळा झाला. समाजातील स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींच्या निमित्त स्वातंत्र्यसैनिक नामकोनशीला अनावरण करण्यात आले. तसेच समाजरत्न, समाजभूषण आणि समाज भूषण संस्थांचा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

दरम्यान, यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक शाहू खैरे यांनी नाशिक शहरातील गावठाण विकासातील अडथळे व समस्या मांडल्या. यासाठी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून समस्या सोडवाव्यात अशी मागणी केली.

या वेळी उद्योजक रामदास जाधव, संस्थेचे पुणे येथील अध्यक्ष नंदकुमार वडनेरे, पद्माकर शिरवाडकर, माजी नगरसेवक शाहू खैरे यांच्यासह राजेंद्र दिंडोरकर, संतोष ओझरकर, राजेंद्र खालपकर, सचिन वडनेरे, गोविंद दंडगव्हाळ, देविदास ओझरकर, नंदकुमार पवार आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

संस्थेचे पुरस्कारर्थी

श्यामराव ओढेकर, मधुकर शिऊरकर, माधवराव वडनेरे, दत्तात्रेय चांदवडकर, अनंतराव धुळेकर, पद्माकर शिरवाडकर, एकनाथ जव्हारकर, शंकरराव पवार, दत्तात्रेय मैंद, प्रभाकर शिऊरकर, रघुनाथ दिंडोरकर, बाळकृष्ण अनकईकर, बाळकृष्ण थोरात अशा सर्व दिवंगत पदाधिकाऱ्यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांकडून पुरस्कार स्वीकारण्यात आले. भगवान दुसानीस, विजय घोडके, बाळासाहेब पिंगळे, अरुण मेद, शरदराव विसपुते, मुकुंद भालेराव या दिवंगत पदाधिकाऱ्यांसह अजित घोडके, श्यामराव वाघ यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विंध्यवासिनी, मनुदेवी सेवाभावी, हरीओम सांस्कृतिक या संस्थांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com