Maratha Reservation: आरक्षणाबाबतची छगन भुजबळांची विधाने ‘कॅल्क्युलेटेड’ राजकारणाचा भाग?

Maratha and OBC reservation issue, Chhagan Bhujbal`s statement is part of politics-मुख्यमंत्र्यांनी कान टोचले तरीही अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांवर परिणाम होण्याची शक्यता कमीच.
CM Eknath Shinde & Chhagan Bhujbal
CM Eknath Shinde & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ गेले काही दिवस सातत्याने मराठा आरक्षण आंदोलनावर गंभीर स्वरूपाची विधाने करीत आहेत. हा त्यांच्या कॅल्क्युलेटे राजकारणाचा भाग असल्याचा दावा जाणकारांनी केला आहे. (Maratha & OBC Reservation issue politics is on serious mode)

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावर सध्या वातावरण तापले आहे. यासंदर्भात मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ‘ओबीसी’ (OBC) घटकांच्या बाजूने विधाने करीत या प्रश्नावर राज्य शासनावर (Maharashtra Government) टीका करणारी विधाने केली आहेत.

CM Eknath Shinde & Chhagan Bhujbal
Ajit Pawar : अजित पवारांनी डेंग्यू आजारपणाबाबत दिले अपडेट; म्हणाले ''पूर्णपणे बरं होण्यास...''

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उपोषण केले. त्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला. जरांगे पाटील यांना राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे प्रस्थापित राजकीय नेत्यांना ते आव्हान ठरले आहे. त्यामुळे या विषयावरून राजकारण सध्या चांगलेच तापले आहे.

यासंदर्भात छगन भुजबळ संस्थापक असलेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून राज्याच्या विविध भागात मेळावे घेण्यात येत आहेत. विविध नेत्यांच्या बैठकांतून मराठा समाजाला कुणबी जातीचे दाखले देऊन ओबीसी गटातून आरक्षण देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यातून भुजबळ यांनी केलेल्या विधानांचा चांगलाच समाचार मराठा आरक्षण आंदोलनातील नेत्यांनी घेतला आहे. भुजबळ हे टीकेचे लक्ष्य झाल्यावर, भुजबळ यांनी देखील आक्रमकपणे विधाने सुरू केली आहे. ती राज्य सरकारवर टीका करणारी आहेत.

सध्या भुजबळ यांची विधाने थेट राज्य शासनाच्या निर्णयावर टीका करणारी आहेत. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत मंत्र्यांना मराठा आरक्षणावर विधाने करण्याचे टाळावे, असा सल्ला दिला होता. मात्र, हा सल्ला प्रामुख्याने छगन भुजबळ यांच्यासाठी होता, हे लपून राहिलेले नाही. मात्र, सध्या भुजबळ यांनी घेतलेली भूमिका हा त्यांच्या कॅल्क्युलेटेड राजकारणाचा भाग असल्याने ते मुख्यमंत्र्यांचा सल्ला कितपत ऐकतील हा प्रश्नच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com