Maratha Community Nashik News : सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य सरकारच्या वेळकाढूपणाच्या धोरणाचा निषेध नोंदवला आहे. त्यासाठी धक्कादायक निर्णय घेत यंदा दिवाळी साजरी न करण्याचे जाहीर केले. यंदाची काळी दिवाळी असल्याचे आंदोलकांनी सांगितले. (Agitation for reservation of Maratha community is on in Nashik)
मराठा समाजाला आरक्षण (Maratha Resrvation) देण्याबाबत राज्य सरकार (Maharashtra Government) वेळकाढूपणा करीत असल्याची संतप्त भावना नाशिकच्या (Nashik) सकल मराठा समाजाने व्यक्त केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आरक्षणाच्या प्रश्नावर विविध स्वरूपाची आंदोलने राज्यभर सुरू आहेत. या प्रश्नावर समाजबांधव आणि आंदोलकांच्या भावना तीव्र होऊ लागल्या आहेत. त्याचे पडसाद विविध शहरांतून उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक येथे आंदोलकांनी वेगळाच निर्णय घेत सरकारला धक्का दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारवर दिवसेंदिवस दबाव वाढत असताना नाशिकमधील सकल मराठा समाजाने यंदा काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. राजकीय कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन करीत तूर्त नाशिक बंद करण्याचा विचार नाही. शांततेच्या मार्गाने मराठा समाजाचे उपोषण सुरू राहणार असल्याचे सर्वपक्षीय नेत्यांनी सांगितले.
येथील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ सकल मराठा समाजाची सभा झाली. या वेळी दत्ता गायकवाड, दिनकर पाटील, करण गायकर, विलास शिंदे, बंटी भागवत, शिवाजी सहाणे, भागवत आरोटे, सुधाकर बडगुजर, प्रताप मेहेरोलिया, अनिल ढिकले, प्रकाश लोंढे, सुरेश मारू, ॲड. तुषार जाधव, ॲड. स्वप्ना राऊत, वत्सला खैरे, पूजा धुमाळ, पूनम पाटील यांनी आपली भूमिका मांडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.