Maratha Reservation: एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाचा आवाज दाबला?

सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे छत्रपती संभाजीराजे यांच्या समर्थनार्थ नाशिकला निदर्शने
Maratha kranti morcha agitation
Maratha kranti morcha agitationSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) च्या बैठकीत विशिष्ट समन्वयकांना झुकते माफ देऊन संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhajiraje), असा आरोप करून मराठा समाजातील (Maratha community) काही समन्वयकांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वावर अविश्‍वास दर्शविणारी वक्तव्य केल्याने याचा निषेध म्हणून जिल्हा (Nashik) ती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. (Maratha kranti morcha angry on CM Shinde`s stand)

Maratha kranti morcha agitation
MVP Election: ‘मविप्र’मध्ये ‘परिवर्तन’; अॅड नितीन ठाकरेंचे पॅनल विजयी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विशिष्ट समन्वयकांना झुकते माफ देऊन संभाजीराजे छत्रपती यांनी सकल समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप संभाजीनगरमधील काही नेत्यांनी केला. त्यानंतर राजेसमर्थकांमध्ये संतापाची लाट तयार झाली. या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली.

Maratha kranti morcha agitation
ACB Action: चक्क शौचालयात घेतली दहा हजाराची लाच

मराठा समाज सुज्ञ आणि जाणकार असल्याने त्या टोळक्याचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. मराठा समाजाचा छत्रपतींच्या नेतृत्वावर गाढा विश्‍वास आहे. कोरोना महामारीच्या काळातदेखील छत्रपतींनी सर्व समाजाचे आरोग्य हित लक्षात घेऊन लोकशाहीमार्गाने आपला लढा सुरू ठेवला आहे. एकूणच छत्रपतींच्या गादीचे थोर उपकार मराठा समाज विसरलेला नाही, ही बाब लक्षात घेऊन संभाजीराजे छत्रपतींवर टीका करण्याची हिंमत दाखवावी. मराठा समाजाचे नेतृत्व केवळ राजे आणि राजेच करू शकतात. त्यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याची ताकद कुठल्याही दलाल टोळक्यात नाही, असे मत या वेळी पदाधिकाऱ्यांनी मांडले.

‘छत्रपती कें सन्मान में, मराठा मैदान में’, ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘एक मराठा-लाख मराठा’, अशा मर्दमराठा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर दणाणून गेला होता. या वेळी मराठा क्रांती मोर्चाचे सुनील बागूल, करण गायकर, गणेश कदम, शिवाजी मोरे, उमेश शिंदे, संतोष माळोदे, विजय खर्जुल, आशिष हिरे, विलास जाधव, बंटी भागवत, प्रमोद जाधव, सोमनाथ जाधव, रूपेश नाठे, सचिन पवार, योगेश गांगुर्डे, अस्मिता देशमाने आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com