Jarange Patil Politics: जरांगे यांचे पुढचे टार्गेट ठरले, येवल्यात छगन भुजबळांना घेरणार?

Maratha, OBC Politics, Jarange Patil will visit Chhagan Bhujbal constituency-मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना येवला मतदार संघातील पदाधिकाऱ्यांनी दिले आंदोलनाचे निमंत्रण
Manoj Jarange Patil & Chhagan Bhujbal
Manoj Jarange Patil & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Jarange Vs Bhujbal: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय आज घेतला. त्यामुळे आता त्यांचे पुढचे टार्गेट कोण? याची चर्चा सुरू झाली असून पुढच्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यात या आंदोलनाचे वादळ घोंगावण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवेली सराटी येथे पाचव्यांदा उपोषण सुरू करण्यात आले होते. या उपोषणावरून सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी जोरदार टीका केली होती. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात जरांगे पाटील यांना आव्हान देखील दिले होते.

Manoj Jarange Patil & Chhagan Bhujbal
Thackeray Vs Shinde : ठाकरे गटाने सरकारची केली कोंडी, सत्ताधारी आमदारही वैतागले!

भाजप नेत्यांनी जरांगे पाटील यांना उपोषणावरून टिकेचे लक्ष्य केले होते. त्यामुळे संतप्त जरांगे पाटील यांनीही भाजपला डिवचले आहे. या घडामोडी पाहता मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा नवा वाद सुरू होऊ शकतो. आगामी काही दिवसात जरांगे पाटील पुन्हा एकदा त्यांच्या विरोधकांना शिंगावर घेण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात राज्यातील ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघातील कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळांच्या विरोधकांनी स्वतंत्रपणे येवला मतदार संघात निवडणुकीची तयारी केली आहे. श्री भुजबळ यांच्या विरोधात वातावरण तापवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Manoj Jarange Patil & Chhagan Bhujbal
Dr Heena Gavit Politics: भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या विरोधकांना हिना गावितांनी सुनावले, 'सत्तेत महाविकास आघाडी, केसी पाडवी...'

अंतरवेली सराटी येथे संपर्क केल्यानंतर या कार्यकर्त्यांना जरांगे पाटील यांनी येवला येथे दौरा करण्याचे आश्वासन दिले. स्थानिक नेत्यांकडून येवल्यात जागा निश्चित केल्यानंतर जरांगे पाटील यांचा कार्यक्रम होईल. श्री जरांगे पाटील काही दिवस येवला मतदार संघात मुक्कामी यावेत, असेही काहींचे प्रयत्न आहेत. त्यात कितपत यश येते याबाबत उत्सुकता आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. त्यात यश आले नाही. त्यानंतर आता ते आपल्या घरचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात निवडणुकीची जोरदार तयारी करीत आहेत.

यंदाच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा कळीचा ठरणार आहे. त्यामुळे भुजबळ यांनी देखील हा विषय गांभीर्याने घेतला आहे. त्यांचे समर्थक विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करीत आहेत. त्यांचा फोकस प्रामुख्याने मतदार संघाचा विकास, पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केलेली मोठी कामे यावर असेल. एकंदरच येवला मतदारसंघातील ही राज्यातील सर्वाधीक चर्चेची निवडणूक ठरण्याची चिन्हे आहेत.

Manoj Jarange Patil & Chhagan Bhujbal
Thackeray group: गिरीश महाजनांच्या मतदारसंघात ठाकरे गट ॲक्टिव्ह; आंदोलनांचा धडाका

अंतरवेली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले. ते उपोषण येवल्यात करण्याचा त्यांचा मानस होता. त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड आग्रह धरला होता. मात्र या आंदोलनाचा नकारात्मक परिणाम होऊ नये, म्हणून ते टाळल्याचे कळते. आता त्यावर पुन्हा एकदा काम सुरू झाले आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com