Jarange Patil In Yeola : जरांगे पाटील देणार छगन भुजबळांना थेट आव्हान?

छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात येत्या ९ ला येवल्यात होणार जरांगे मनोज पाटील यांची सभा Maratha reservation agitation leader Manoj Jarange Patil in Yeola-sd67
Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Chhagan Bhujbal & Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Jarange patil V/S Chhagan bhujbal News : मराठा आरक्षणावरून राज्य सरकार विरुद्ध मराठा आंदोलक असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. त्यात एक अँगल ओबीसी आणि मराठादेखील आहे. या पार्श्वभूमीवर या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील येत्या ९ ऑक्टोबरला थेट येवल्यात दाखल होत आहेत. (Maratha Reservation issue will raised in Yeola by Manoj Jarange Patil)

मराठा (Maratha) समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन त्यांना आरक्षण द्यावे ही मनोज जरांगे पाटील (Manoj Patil) यांची मागणी आहे. मराठा समाजाला ओबीसी (OBC) आरक्षणातून आरक्षण देऊ नये ही छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची भूमिका आहे.

Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Congress Nashik News : जर्जर झालेल्या काँग्रेसला प्रणिती शिंदे काय मात्रा देणार?

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात येत्या ९ ऑक्टोबरला सकाळी दहाला जरांगे- पाटील यांची जाहीर सभा होणार आहे. या वेळी मोठ्या संख्येने मराठा समाजाचे कार्यकर्ते जमतील, असा दावा संयोजकांनी केला आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनस्थळी भेट देऊन जरांगे पाटील सभेला उपस्थित राहतील, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली.

जरांगे पाटील हे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे येवल्या तालुक्यातदेखील तेवढ्याच ताकदीची सभा व्हावी म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने प्रत्येक गावामध्ये सभेचे फलक लावण्यात येणार आहेत. सभेसाठी येवल्यासह लासलगावच्या ४२ गावांसह तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.

Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Hemant Patil Nanded News | बघा खासदार हेमंत पाटलांनी काय केलं ? |

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com