Chhagan Bhujbal News : जरांगे पाटलांनंतर मंत्री भुजबळांविषयी बदनामीची पोस्ट व्हायरल

Maratha OBC Reservation Chhagan Bhujbal Posts Viral : आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी वाद वाढत चालला असून, त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटत आहेत...
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News : मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य पातळीवर तीव्र संघर्ष सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलेच वाक् युद्ध रंगले आहे, परंतु या दोन्ही नेत्यांमधील संघर्षाचे पडसाद आता गावपातळीवर उमटले आहेत.

मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष सुरू झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाल्याचा प्रकार नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात घडला आहे.

Chhagan Bhujbal
Rohit Pawar On Bhujbal:'...पण भुजबळांनी ओबीसी कल्याण खाते सांभाळले नाही'; रोहित पवारांचा टोला

मंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी आक्षेपार्ह संदेश समाज माध्यमांमध्ये व्हायरल केल्यामुळे आढळगाव (ता. श्रीगोंदे) येथे बंद पाळण्यात आला. मंत्री भुजबळ यांची बदनामी होईल, अशी पोस्ट काहींनी समाज माध्यमांवर व्हायरल केली होती. ही पोस्ट पाहिल्यानंतर त्यावरून ओबीसी समाज संघटित झाला. पोस्टविषयी संताप व्यक्त करण्यात आला.

प्रमुख कार्यकर्त्यांनी निषेध सभा बोलावली आणि गावबंदची हाक दिली. या वेळी राज्यपातळीवर सुरू असलेल्या नेत्यांमधील संघर्षाचे परिणाम गावगाड्यावर होऊ लागले आहेत. यातून समाजाचीच बदनामी होत आहे.

अशा काळात वाईट प्रवृत्ती बळावतात. यापासून सावध राहण्याचा काहींनी आग्रह या वेळी धरला. व्यापाऱ्यांनी गावबंदमध्ये सहभाग घेतला. गावबंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सरपंच शिवप्रसाद उबाळे, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष शरद जमदाडे, जिजाराम डोके, राहुल राऊत, उत्तम राऊत, ओंकार शिंदे, झुंबर राऊत या प्रमुख कार्यकर्ते निषेधात सहभागी झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आक्षेपार्ह पोस्टनंतर गायब झालेली महिला सरपंच गावात परतली

दरम्यान, शेंडी (ता. नगर) येथे तीन दिवसांपूर्वी महिला सरपंचाने मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्याचेही पडसाद उमटले होते. गावकऱ्यांनी गावबंद ठेवला होता.

गावातून मोर्चा काढण्यात आला होता. महिला सरपंचाच्या पोस्टरला काळे फासण्यात आले होते. एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हादेखील झाला आहे. यानंतर ही महिला सरपंच कुटुंबासह गावातून गायब झाली होती.

महिला सरपंचावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी गावकऱ्यांनी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली होती. ही महिला सरपंच काल रात्री साडेनऊ वाजता पोलिस बंदोबस्तात गावात दाखल झाली आहे. एमआयडीसी पोलिसांचा गावात बंदोबस्त आहे.

Chhagan Bhujbal
Maratha Reservation: मराठा क्रांती मोर्चा आक्रमक अन् मंत्री भुजबळांच्या प्रतिमेबरोबर केली अशी कृती...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com