Manoj Jarange Patil News : शेणीत येथे १०१ एकरवर रेकॉर्डब्रेक सभेचा निर्धार!

Maratha Reservation issue : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या दौऱ्यात इगतपुरी, सिन्नर, नाशिक ढवळून काढण्याचा निर्धार
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama

Maratha Reservation News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्यालादेखील तेवढाच मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. शेणीत (इगतपुरी) येथे २२ नोव्हेंबरला १०१ एकरवर सभा होत आहे. या सभेसाठी ३५ एकरवर तीन ठिकाणी वाहनतळ उभारण्यात येणार आहे. (Igatpuri and Surrounding area prepared for Maratha Reservation Rally)

मराठा आरक्षणाचे आंदोलन (Maratha Reservation) धगधगते ठेवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या टप्प्यात राज्याचा दौरा (Maharashtra) सुरू केला आहे. यासंदर्भात नाशिकला (Nashik) त्यांची मोठी सभा करण्याचे नियोजन आहे.

Manoj Jarange Patil
Sushma Andhare News : सुषमा अंधारेंनी फडणवीसांना करून दिली 'त्या' पत्राची आठवण; जनरल मोटर्सच्या कामगारांना न्याय...

जरांगे पाटील यांच्या सभेसाठी इगतपुरी तालुक्यातील विविध सरपंच, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सकल मराठा समाजातर्फे विविध कार्यकर्ते मनापासून कामाला लागले आहे. या सभेच्या तयारीसाठी अतिशय बारीक नियोजन केले आहे. त्यात पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. त्याचबरोबर लगतच्या तिन्ही तालुक्यातील समाज बांधवांनी या सभेला उपस्थित रहावे, यासाठीदेखील त्यांचे प्रयत्न आहेत.

शेणीत (इगतपुरी) येथे १०१ एकर क्षेत्रावर २२ नोव्हेंबरला, बुधवारी सकाळी नऊला ही सभा होईल. या सभेला नाशिक, इगतपुरी आणि सिन्नर या तीन तालुक्यांतून नागरिक सहभागी होतील. ६७ गावांच्या वतीने ही सभा होत आहे. या गावांतील नागरिकांनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे.

पाच हजार स्वयंसेवक त्यासाठी काम करतील. प्रसाधनगृहदेखील उभारण्यात येणार आहेत. ३५ एकरवर तीन तालुक्यांच्या दिशेला प्रत्येकी एक वाहनतळ उभारण्यात येणार आहे. यामध्ये सामान्य कार्यकर्ते, युवा वर्ग अतिशय हिरिरीने पुढे येऊन काम करीत असल्याचे संयोजकांनी सांगितले.

मराठा समाज म्हणजेच कुणबी आहेत, त्याचे अतीशय जुने रेकॉर्ड महसुल, ग्रामपंचायती, नगरपालिका तसेच विविध नोंदीतून आढळले आहेत. त्यामुळे मराठा अर्थात कुणबी ‘ओबीसी’ आहेत. याबाबत काही हितशत्रूंकडून सुरू असलेल्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी ही सभा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या सभेला विशेष महत्त्व आहे.

Manoj Jarange Patil
Kolhapur Politics : ऐन दिवाळीत मंत्री मुश्रीफांच्या मुखात खर्डा-भाकर; कारण काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com