Manoj Jarange Patil News : ‘येवलेकरांनो सावध राहा, येणारा काळ कसोटीचा’

Maratha Reservation Issue : मराठा आरक्षणाला पाठिंब्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील समर्थकांशी साधला संवाद
Yeola Maratha followers
Yeola Maratha followersSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील मराठा आरक्षणाचे समर्थक तीनशे वाहनांचा ताफा घेऊन अंतरवाली सराटी (अंबड) येथे मनोज जरांगे पाटील यांना भेटले. या वेळी येवलेकरांनी आगामी काळात जागरूक राहावे, असा कानमंत्र दिला. (Yeola`s Maratha reservation followers visit with 300 vehicles convoy to Jarange Patil)

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला (Maratha Reservation) पाठिंबा म्हणून येथील युवकांनी येवला (Nashik) ते रायगड मशाल यात्रा काढली होती. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मतदारसंघातील या युवकांनी परतल्यावर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

Yeola Maratha followers
Advay Hiray Arrested : अद्वय हिरे यांचा मुक्काम रात्रभर पोलिस ठाण्यात; समर्थकांचा गराडा

या वेळी येवल्यातील युवकांशी जरांगे पाटील यांनी चर्चा केली. ते म्हणाले, आरक्षणाची लढाई आपण ७० टक्के जिंकलेली आहे. कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्रे मिळत आहेत. आपल्या भावांना ७० वर्षांपासून प्रमाणपत्र नाहीत, असे सांगितले जात होते. प्रशासन नोंदीच नाहीत, असे सांगत होते, मग आता कसे काय पुरावे सापडले.

आता सापडत आलेल्या नोंदींवरून समितीचा अहवाल तयार होईल. त्यातून मराठा आणि कुणबी हे एकच आहे सिद्ध होईल. येत्या २४ तारखेला सरकार याबाबत कायदा केल्याचा ठराव करील. त्यामुळे उर्वरित सर्वांना ओबीसीमधूनच कुणबी म्हणून पन्नास टक्क्यांच्या आत आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण मिळेल, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

या वेळी जरांगे पाटील यांनी या कार्यकर्त्यांशी बोलताना, येवल्याचा संदर्भ देत आगामी काळात सर्वांनाच अधिक जागरूक राहावे लागेल. हा काळ कसोटीचा आहे. त्यामुळे सर्वांनी अतिशय जागरूक राहून कायदा हातात घेण्याचा अजिबात प्रयत्न करू नये. आपले आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू आहे. त्यावर आपला विश्वास आहे.

दरम्यान, रायगड येथून आणलेल्या मशालीला उंचावून पायी मशाल आणलेल्या संकेत शिंदे, अमृत जमधडे, रवी बांगर, समाधान जमधडे, ऋषी काळे, हिंमत जमधडे, अमृत जमधडे या कार्यकर्त्यांचे जरांगे पाटील यानी कौतुक केले. सलग साठ दिवस आंदोलनात सहभागी असलेल्या गोरख संत यांना पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला.

Yeola Maratha followers
Maratha Reservation : हुडहुडी भरविणाऱ्या थंडीत पहाटे तीन वाजता जरांगेंच्या सभेसाठी तरुणांचा उत्साह कायम...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com