Manoj Jarange Patil Agitation: सकल मराठा समाजाचे थेट राज्यपालांना साकडे; मराठा आंदोलन बदनाम करण्याच्या कारस्थानाची चौकशी करा!

Maratha Reservation; Maratha community urges Governor to investigate infiltration during reservation movement-सकल मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी आजवरची सर्व आंदोलने व मोर्चे शांततेत काढल्याने त्याची जगभरात दखल घेतली गेली आहे.
Maratha delegation with Nashik Collector
Maratha delegation with Nashik CollectorSarkarnama
Published on
Updated on

Manoj jarange Patil News: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन शांततेत सुरू असतानाही त्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न होत आहे. त्यात बाहेरचे आंदोलन घुसविले जात असल्याचा गंभीर आरोप सकल मराठा समाजाने केला आहे.

यासंदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट राज्यपालांना साकडे घातले आहे. आज सकाळी मराठा समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्यपालांसाठी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात मुंबईतील आंदोलनाला राज्य शासनाने सर्वच सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. यासाठी सरकारला आदेशित करावे अशी मागणी करण्यात आली.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनात बाहेरील व्यक्तींनी घुसखोरी केली. या घुसखोरांकडून आंदोलन बदनाम करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. अदृश्य शक्ती त्याला मदत करीत आहेत. घुसखोरी करून आंदोलन विस्कळीत व बदनाम करण्याचा प्रयत्न झाला.

Maratha delegation with Nashik Collector
Chhagan Bhujbal Politics: समता परिषद आक्रमक; मराठा समाजाचा प्रश्न सोडवा, मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही!

आंदोलकांनी संशयास्पद वाटणाऱ्या काही लोकांची चौकशी केली असता परराज्यातून हे लोक आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनाशी या घूसखोरांचा कुठलाही संबंध नसताना आंदोलनाचे साहित्य व टोप्या घालून हे लोक गडबड करताना आढळले आहेत. या प्रकरणांची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी.

मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात ५८ मूक मोर्चे काढले. आजवर केलेली सर्व आंदोलने अत्यंत शांततेत पार पडली. त्याची जगभरात दखल घेण्यात आली. मराठा आंदोलक कधीही कायदा हातात घेऊन किंवा समाजाला त्रास होईल असे कोणतेही कृत्य करीत नाहीत. त्यामुळेच समाज व आंदोलनाची ही प्रतिमा मलीन करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे हे उघड झाले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या न्याय हक्कासाठी आंदोलन सुरू आहे. संवैधानिक व न्याय आंदोलनास कोणतेही गालबोट लागू नये यासाठी सरकारने विशेष पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली. यावेळी राज्य समन्वयक करण गायकर, नाना बच्छाव, विलास पांगारकर, केशव अण्णा पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नितीन सुगंधी, राजू देसले, प्रफुल्ल वाघ, ममता शिंदे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com