Maratha Politics : दीड महिन्याने मतदारसंघात येणाऱ्या भुजबळांविरोधात मराठा समाज करणार मोठी घोषणा?

Maratha v/s Bhujbal politics, Maratha followers call meeting today-छगन भुजबळ यांच्या येवला-लासलगाव मतदारसंघातील ४२ गावांतील कार्यकर्त्यांची आज होणार तातडीची बैठक
Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Chhagan Bhujbal & Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आज आपल्या येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर येवला, लासलगावच्या ४२ गावांतील सकल मराठा समाजाच्या युवा कार्यकर्त्यांनीदेखील आज तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे भुजबळांचा दौरा कसा होतो, याची उत्सुकता लागली आहे. (Minister Chhagan Bhujbal will visit today in his own constituency)

यंदाची दिवाळी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनातच गेली. तेव्हापासून मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) त्याविरोधात विविध स्तरांवर भूमिका घेत आहेत. त्यानंतर आज ते आपल्या मतदारसंघात (Nashik) येत आहेत.

Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Maharashtra Politics : जोर, बैठका बावनकुळेंच्या; खासदारकीची स्वप्ने दादा भुसे यांची!

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील, तसेच आरक्षणाच्या आंदोलनाला थेट आव्हान देणारे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात त्यांच्या मतदारसंघातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय तीव्र नाराजी व्यक्त केली होती. भुजबळ यांच्या विरोधात विविध स्वरूपाची आंदोलनेदेखील झाली होती.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी येथे बेमुदत उपोषण सुरू केले होते. येथील हनुमाननगर ग्रामपंचायतीने ठराव करून भुजबळ यांच्याकडून निधी घेणार नसल्याचे जाहीर केले होते. जरांगे पाटील यांनीदेखील येवल्याचा दौरा करून भुजबळ यांना आव्हान दिले होते.

एकंदरच येवला-लासलगाव मतदारसंघातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांचा प्रदीर्घ काळाने दौरा जाहीर होताच, त्याची प्रतिक्रिया उमटली. येथील बेचाळीस गावांतील सकल मराठा समाजाच्या युवा कार्यकर्त्यांनी आज दुपारी तातडीची बैठक बोलावली आहे. त्यात पुढील निर्णय घेणार आहे. त्यामुळे या प्रश्नावर वातावरण तापले आहे. त्याच्या काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे लक्ष लागले आहे.

अन्न व नागरी पुरवठामंत्री भुजबळ आज दुपारी येवला येथे आपल्या कार्यालयात येणार आहेत. या वेळी ते येवल्यातच मुक्काम करतील. त्यानंतर उद्या (ता. ३०) ते अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा करतील. त्यात कातरणी, सोमठाण देश, निळखेडा (येवला) तसेच निफाड तालुक्यातील वेळापूर, पिंपळगावनजीक, वनसगाव, थेटाळे या गावांना भेटी देऊन नाशिकला येतील. या दौऱ्याला तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस तसेच प्रशासनावरदेखील तणाव आहे.

Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil
Amit Shaha In Kolkata : अमित शाह आज ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात; लोकसभेचे रणशिंग फुंकणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com