सत्ता असो वा नसो, विकासात खंड पडणार नाही!

छगन भुजबळ यांना मतदारसंघातील नागरीकांना आश्वासन देत विकासकामे सुरुच राहतील असे सांगितले.
Chhagan Bhujbal in Niphad Meeting
Chhagan Bhujbal in Niphad MeetingSarkarnama
Published on
Updated on

लासलगाव : सत्ता ही जात येत असते, त्यामुळे सत्ता असो किंवा नसो येवला (Yeola) मतदासंघांच्या विकासात खंड पडणार नाही असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. त्यांच्या हस्ते येवला मतदारसंघांतील निफाडमधील (Niphad) सारोळे खुर्द येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजना व विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. (May government change in state devolopment of people will not affect)

Chhagan Bhujbal in Niphad Meeting
सत्तांतराचे परिणाम... चांगल्या अधिकाऱ्यांच्याही होताहेत बदल्या!

श्री. भुजबळ म्हणाले, सद्या राज्यात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, ती अतिशय गुंतागुंतीची असून त्याचा संपूर्ण निकाल हा न्यायालयाच्या हातात आहे. न्यायालय देईल त्यावर सरकारचे भवितव्य ठरेल. त्याची चिंता करण्याचे कुठलेही काम नाही. आपली विकासाची कामे ही निरंतर सुरू राहतील. येवला मतदासंघांच्या विकासात कुठलाही खंड पडणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

Chhagan Bhujbal in Niphad Meeting
Raj Thackeray : फडणवीसांना राज ठाकरे म्हणाले, "फुकटचं श्रेय घेऊ नका"

श्री. भुजबळ पुढे म्हणाले की, संपूर्ण राज्याच्या जिल्हा नियोजनाचा निधी सरकारने थांबविला आहे. हा निधी सरकारने लवकरात लवकर द्यावा, त्यामुळे जनहिताची अनेक कामे रखडली आहे. हा निधी कुण्या एकट्यासाठी नाही तर सर्व जिल्ह्यांच्या व राज्यातील सर्व सामान्य नागरिकांच्या हितासाठी असल्याचे त्यांनी सांगितले.

सरपंच दत्तात्रय पाटील डुकरे, हरिश्चंद्र भवर, डी. के. जगताप, शिवा पाटील सुरासे, बाबाजी जेऊघाले, माधवराव ढोमसे, सुरेश खोडे, संदीप भोसले, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, शिवाजी सुपनर, अनुप वनसे, विष्णू वन्से, म्हसू भोसले, कैलास भोसले, सतीश भोसले, नवनाथ जेऊघाले, अश्विन भोसले, रावसाहेब जेऊघाले, विष्णू डुकरे, गोविंद जेऊघाले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संपूर्ण देशाचा प्रश्‍न सोडवावा

श्री. भुजबळ पुढे म्हणाले,‘ देशातील प्रत्येक लहान लहान घटकाला स्वातंत्र्याचा फायदा मिळाला पाहिजे. घटनेने त्यांना दिलेले हक्क त्यांना मिळाले पाहिजे तरच आपण सर्वसमावेशक विकास साधू शकतो. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. यामध्ये जे जे लोक रस्त्यावर उतरले, लढा दिला, त्या सर्वांचे यामध्ये श्रेय आहे. ओबीसी आरक्षणाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशचा प्रश्न आज सुटला असेल तरी संपूर्ण देशाचा हा प्रश्न आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशभरात ओबीसींना संविधानिक आरक्षण मिळवून द्यावे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com