महापौरांचा हट्ट पुरवला... मात्र फक्त पाच दिवसांसाठी!

रामायण निवासस्थान महापौरांसाठी खुले असल्याचे प्रशासनाने सांगितले.
Satish Kulkarni
Satish Kulkarnisarkarnama
Published on
Updated on

नाशिक : महापालिकेची (NMC) मुदत संपुष्टात आल्यानंतर पदाधिकाऱ्यांची कार्यालये ताब्यात घेण्यावरून प्रशासन व महापौर सतीश कुलकर्णी (Satish kulkarni) यांच्यात रंगलेला कलगीतुरा प्रशासकांच्या (Kailas Jadhav) भूमिकेनंतर संपुष्टात आला. महापौरांचे रामायण निवासस्थान रविवार पर्यंत सतीश कुलकर्णी यांना वापरता येणार आहे.

Satish Kulkarni
अजितदादा बोलले पुण्यात...नेत्यांची झोप उडाली महाराष्ट्रात!

१३ मार्चला महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिकची मुदत संपुष्टात आल्यानंतर नगरसचिव विभागाकडून पदाधिकाऱ्यांची वाहने व कार्यालये ताब्यात घेण्यात आली. महापौरांच्या रामायण निवासस्थानाला नगरसचिव विभागाकडून कुलूप लावल्यानंतर माजी महापौर सतीश कुलकर्णी भडकले. प्रशासक कैलास जाधव यांच्याशी पत्रव्यवहार करून नगरसेवकांच्या कामांसाठी आठवडाभर रामायण निवासस्थानाचा वापर करू द्यावा, अशी विनंती केली होती.

प्रशासक जाधव यांनी मागणी मान्य करत रविवार (ता.२०) पर्यंत रामायण बंगला वापरण्यास परवानगी दिली, परंतु त्यात सामान वाहण्यासाठी असा उल्लेख करताना प्रशासकांनी कायदेशीर अडचणीतून सुटका करून घेतली आहे. त्याचबरोबर राजकीय कामासाठी निवासस्थान वापरता येणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे तूर्त वाद मिटल्याचे दिसत आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com