Onion Traders issue : कांदा प्रश्नाच्या बैठकीला धनंजय मुंडेंनी मारली दांडी!
Nashik Farmers & Traders Issue Pressure : कांदा व्यापाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठीच्या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री गोयल यांनी मंत्री धनंजय मुंडे व पणनमंत्री अब्दुल सत्तार यांना दिल्लीत बोलावले होते. पण कृषिमंत्री या बैठकीला गेलेच नाहीत. मंत्री सत्तार यांच्या उपस्थितीत काय निर्णय झाला, याविषयी व्यापाऱ्यांना अद्याप कुठलीही माहिती कळवण्यात आलेली नाही.(Onion Traders issue`s impact on Farmers now)
दहा दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद असताना त्याबाबत अद्याप तोडगा काढण्यात सरकारला यश आलेले नाही. मुंबईपाठोपाठ दिल्लीत जोर बैठका पार पडल्या, पण व्यापाऱ्यांचे अद्याप समाधान झालेले नाही. त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांच्या या प्रश्नांची झळ आता थेट शेतकऱ्यांना बसली आहे.
या पार्श्वभूमीवर आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आज (ता. ३०) पुन्हा बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय तोडगा निघतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कांदा निर्यातीवरील ४० टक्के शुल्क हटवण्यासह इतर मागण्यांसाठी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदला झुगारून विंचुर कृषी उत्पन्न उपबाजार समितीने गुरुवार (ता.२८) पासून लिलाव सुरू केले आहेत.
गणेश विसर्जनामुळे फक्त एक वेळ लिलाव घेण्यात आले, तर उर्वरित १६ बाजार समित्यांमध्ये अजूनही कांदा लिलाव बंद आहेत. शनिवारी या संदर्भात व्यापारी निर्णय घेणार आहेत. कांदा व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसदर्भात मंगळवारी मुंबईत केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची बैठक पार पडली.
या बैठकीत व्यापाऱ्यांचे कुठलेही समाधान झाले नाही. त्यामुळे कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी कायम ठेवला. याच बैठकीत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे व पणनमंत्री अब्दुल सत्तार यांना शुक्रवारी दिल्लीत बोलावले होते.
‘नाफेड’च्या कांदा खरेदीसंदर्भात या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या बैठकीत काय निर्णय होतो, यासाठी व्यापाऱ्यांनी शुक्रवारऐवजी शनिवारी बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लिलाव कधी सुरू होतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, गणेश विसर्जनाचा मुहूर्त साधत विंचुर बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू करण्यात आले. बंदनंतर पहिल्याच दिवशी ३० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. त्याला कमीत कमी ५०० व जास्तीत जास्त २४०० रुपये दर मिळाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.