PNB Scam : मेहुल चोक्सीची नाशिक जिल्ह्यातली नऊ एकर जमीन जप्त

मेहुल चोक्सीची आत्तापर्यंत 19 हजार कोटी रुपयांची संपत्ती ईडी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांनी मिळून जप्त केली आहे.
Mehul Choksi
Mehul Choksisarkarnama

मुंबई : पंजाब नॅशनल बॅक (PNB Scam) गैरव्यवहारातील आरोपी हिऱ्यांचा व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मेहुल चोक्सीची नाशिक जिल्ह्यातील ९ एकर जमीन आयकर विभागाने जप्त केली आहे.

बळवंतवाडीमध्ये मेहुल चोक्सीच्या नावावर असलेले ही जमीन आयकर विभागाने जप्त केली आहे. मेहुल चौक्सी अद्याप भारतात परत आलेला नाही. मात्र त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून त्याअंतर्गतच नाशिक जिल्ह्यातील जमीन जप्त करण्यात आली आहे.

आर्थिक गैरव्यवहार, बँक घोटाळा, मनी लाँड्रींग, पीएनबी बँकेसह हजारो कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या मेहुल चोक्सीच्या बेनामी संपत्तीवर आयकर विभागाने कारवाई केलेली शेकडो एकर बेनामी जमीन नाशिक जिल्ह्यातील ईगतपुरी तालुक्यात असल्याचे समोर आले आहे.

Mehul Choksi
खैरे म्हणतात, ''मला अजूनही खासदार असल्यासारखे वाटतयं..''

मुंढेगावच्या बळवंतवाडीमध्ये मेहुल चोक्सीच्या नावावर असलेले ही जमीन आयकर विभागाने जप्त केली आहे. मेहुल चोक्सीची आत्तापर्यंत 19 हजार कोटी रुपयांची संपत्ती सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांनी मिळून जप्त केली आहे.

चोक्सीला पकडण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस घोषित केली असून चोक्सी यंत्रणांना सतत गुंगारा देत आहे. चोक्सीची बळवंतवाडीतील जप्त केलेल्या जागेची किंमत शेकडो कोटींच्या घरात असून आयकर विभागाने जप्त केलेल्या जागेवर बँकांसह कुणालाही दावा करता येणार नसल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे.

Mehul Choksi
इम्रान यांचे अनेक कारनामे समोर ; पंतप्रधान शाहबाज यांच्याकडून अनेक गुपितं उघड

गीतांजली जेम्ससह, नाशिक मल्टी सर्व्हिसेस एसईझेड लिमिटेडच्या नावे नामी आणि बेनामी संपत्ती असल्याचे समोर आले आहे. आयकर विभागाने एकूण 57 गटातील शेकडो एकर जागा केली जप्त केली आहे. आता ही जमीन जप्त करण्यात आल्यानंतर त्यासंबंधीचे कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com