Milk Producers Protest : दूध उत्पादकांचा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखेंना इशारा, म्हणाले...

Radhakrishna Vikhe : यासंदर्भात दूध उत्पादकांनी पाथर्डी तहसीलदार शाम वाडकर यांना निवेदनही दिले.
Milk Producers
Milk ProducersSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar news : राज्यात दूर दरवाढीवर दूध उत्पादक दिवसेंदिवस आक्रमक होत चालले आहेत. राज्य सरकारने दुधाला हमी भाव दिला असून, त्याप्रमाणे दूध खरेदी करावी. तसेच इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पाथर्डीत दूध उत्पादक एक डिसेंबरला आंदोलन करणार आहेत. त्यांनी राज्याचे दुग्धविकास तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.

दूध उत्पादकांनी पाथर्डी तहसीलदार शाम वाडकर यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. दुधाला हमी भावाबरोबरच, पशुखाद्याच्या किमती कमी कराव्यात. तसेच पाथर्डीत दुष्काळी स्थिती तीव्र होऊ लागली आहे. त्यामुळे जनावरांसाठी चारा डेपो सुरू करावेत अशा मागण्यांचे निवेदन दूध उत्पादक आदिनाथ देवढे, आनंद सानप, ज्ञानेश्वर खवले, अक्षय वायकर, शहादेव भाबड, दत्तात्रय बडे, तुकाराम देवढे, महेश दौंड, प्रेमचंद खंडागळे, भीम गर्जे, महादेव मरकड, डॉ. सुहास सोनवणे, गणेश देवढे यांनी दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे यांनी 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ याकरिता 34 रुपये दर दिला जाईल, असे जाहीर केले होते. मात्र शासकीय दूध संघ आणि खासगी दूध संस्था मात्र दुधाला 25-26 रुपये प्रतिलिटरप्रमाणे भाव देत आहेत. हमी भावाची घोषणा करून देखील दूध उत्पादकांची सरकारकडून फसवणूक करण्यात आली आहे. चारा व पशुखाद्याचे दर कडाडले असल्याने दूध व्यवसाय कोलमडण्याच्या अवस्थेत आहे. दूध दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला की, जिल्ह्यात दूध भेसळ अधिक असल्याचे कारण दिले जाते ते चुकीचे असल्याचा दूध उत्पादकांनी म्हटले आहे.

पाथर्डी आणि शेवगावमध्ये गंभीर दुष्काळ आहे. दोन्ही तालुक्यात नऊ मंडलातील अनेक गावे दुष्काळी यादीतून वगळली आहेत. दूध उत्पादकांसमोर जनावरांना होत असलेल्या लम्पी आजारासोबतच चारा आणि पशुखाद्याच्या किमतींचे संतुलन साधून दूध व्यवसाय टिकवणे आव्हान ठरले आहे. अशातच शासकीय हमीभाव झुगारून देत दूध उत्पादकांना खुलेआम लुटणाऱ्या प्रकल्पांवर कारवाई व्हावी, अशी मागणी दूध उत्पादकांनी केली.

Milk Producers
Radhakrishna Vikhe : आक्रमक वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर जरांगे, भुजबळांना उद्देशून विखेंचं विधान, म्हणाले....

दूध दर कमी होण्यास भेसळीचे कारण सांगणाऱ्या मंत्र्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत किती कारवाया केल्या, हा असा प्रश्न करत आंदोलनकर्त्यांनी दूध दर मूल्य आयोगाची स्थापना करून जनावरांना विमा कवच योजना उपलब्ध करून द्यावी. तसेच प्रत्येक गावात पशुवैद्यकीय केंद्र सुरू करावे, अशा मागण्या आहेत.

या मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास एक डिसेंबरला 'दूध आणि दुष्काळाचा एल्गार' या आंदोलनात पाथर्डीतील नाईक चौकात राज्याचे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे यांना दुग्धाभिषेक घालून अनोखे निषेध आंदोलन केले जाईल, असा इशारा दूध उत्पादकांनी दिला आहे. या आंदोलनात दूध उत्पादक आणि शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com