Imtiaz Jalil News: कर्नाटकच्या विजयानंतर इम्तियाज जलीलही म्हणतात, आम्ही महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार...

Political News: खासदार इम्तियाज जलील आज अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
Imtiaz Jalil News
Imtiaz Jalil NewsSarkarnama

Ahmednagar News : एमआयएम महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार असल्याचं मोठं वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे. भाजपला हरवण्यासाठी आम्ही कसलीही कुर्बानी देण्यासाठी तयार आहोत, असं जलील म्हणाले आहेत. इम्तियाज जलील आज अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

इम्तियाज जलील म्हणाले, "आम्ही महाविकास आघाडीसोबत आघाडी करण्यास तयार आहोत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत असेल आम्ही ताकदवान आहोत, तर त्यांनी आमच्याकडे यावं.

खासदर असदुद्दीन ओवेसी यांचं नेतृत्व स्वीकारावं. तर आम्ही त्यांच्या सोबत जाऊ. भाजपला हरवण्यासाठी जे लोक प्रयत्न करत आहेत, त्या लोकांसाठी आम्ही आमच्याकडून पाहिजे ती कुर्बानी देण्यासाठी तयार आहोत", असं इम्तियाज जलील म्हणाले आहेत.

Imtiaz Jalil News
Mahavikas Aghadi News: आगामी निवडणुका एकत्र लढवण्याबाबत 'मविआ'च्या बैठकीत काय ठरलं?

यावेळी इम्तियाज जलील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. याबरोबरच छत्रपती संभाजीनगर येथे दंगल झाली, त्यादिवशी वरिष्ठ पोलीस अधिकारी कुठे होते आणि काय करत होते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, एमआयएम महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार असल्याचं वक्तव्य जलील यांनी केलं. आता यावर महाविकास आघाडी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited By : Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com