शिरपूरला बिसलरीचे पाणी अन् शेजारी धुळ्यात आठ दिवस पाणी नसते!

धुळे महापालिका प्रशासनाचे पुरवठ्यासह वितरणाचे गणित चुकतेय
Amrishbhai Patel
Amrishbhai PatelSarkarnama
Published on
Updated on

धुळे : शिरपूरला रोज बिसलरी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. मात्र, धुळे शहरात आजही आठ ते दहा दिवस पाणी नसते. धुळ्याला मदत करू शकता का, यावर भाजपचे अमरिशभाई पटेल (Amrishbhai Patel) म्हणाले, `सल्ला मागितला तर मदत करू, मात्र पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही पाणी मिळत नाही. यात कुठेतरी चुकतय याचे आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे`

Amrishbhai Patel
उमेदवार दिलदार असल्याने निवडणूक बिनविरोध होऊनही मतदारांत खुषी!

धुळे-नंदुरबार मतदारसंघात बिनविरोध निवडीनंतर ते बोलत होते. ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना सहकार्य करेल. मात्र, अशा संस्थांच्या कामकाजात मी ढवळाढवळ करत नाही. कुणी अडचण मांडली तर ती सोडवणुकीसाठी मदत करतो.

धुळे महापालिका प्रशासनाने पाणीप्रश्‍नी सल्ला मागितला तर मदत करेल. मी १९८५ पासून शिरपूर पालिका ताब्यात ठेवली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह नागरी प्रश्‍नांच्या सोडवणुकीचा दीर्घ अनुभव आहे. त्याचा लाभ मागितला तर महापालिकेला देऊ शकेल. महापालिका क्षेत्रात ८०० एमसीएफटी म्हणजेच चोवीसशे कोटी लिटर क्षमतेचे हरण्यामाळ धरण आहे. शिवाय आणखी तीन पाण्याचे स्रोत आहेत. याचा अर्थ पाण्याची मुबलकता आहे. तरीही धुळे शहराला आठ ते नऊ दिवसांनी पाणीपुरवठा होत असेल तर कुठेतरी महापालिका प्रशासनाचे पुरवठा व वितरणाचे गणित चुकते आहे. यात नगरसेवकांच्या नावाने ओरड केली जाते. प्रत्यक्षात हा प्रशासकीय कामकाजाचा भाग आहे.

Amrishbhai Patel
अमरिशभाई हे खानदेशचे गडकरी, ते हवेत केंद्रीय मंत्रीमंडळात!

आयुक्त देविदास टेकाळे यांची भेट झाली आणि त्यांनी मदत मागितली तर धुळे शहराचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी तत्पर असेल. शिरपूरजवळ तापी नदीचा स्रोत आहे. त्यात वर्षभर पंचवीसशे एमसीएफटी म्हणजेच ७५ हजार कोटी लिटर पाणी पडून असते. त्याबाबत योग्य नियोजनातून शिरपूरला पाणीपुरवठ्याचे वितरण केले जाते. त्यामुळे पाणीप्रश्‍न भेडसावत नाही, असेही आमदार पटेल म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, राजगोपाल भंडारी, प्रभाकर चव्हाण, श्‍यामकांत इशी, देवेंद्र पाटील उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com