बच्चू कडू संतापले, `अरे, तुम्ही तर मंत्री जयंत पाटील यांच्या पत्रालाही दाद देत नाही`

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज नाशिकच्या थेट पाटबंधारे कार्यालयात जाऊन झाडाझडती घेतली
State minister Bachhu Kadu in Irrigation Office.
State minister Bachhu Kadu in Irrigation Office.Sarkarnama
Published on
Updated on

नाशिक : राज्यमंत्री बच्चू कडू आज नाशिकला आले. न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या कडू यांनी तडत सिंचन भवन गाठले. कार्यालयात जाऊन किती कर्मचारी हजर आहेत?. ते काय काम करता? आलेल्या पत्रांवर काय कार्यवाही होते, अशा विविध प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. कामाकाजाच्या नोंदी पाहून ते म्हणाले, अहो कसे तुमेच कार्यालय चालते. जनतेशी बांधिलकी ठेवा. सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करा, असे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुनावले.

State minister Bachhu Kadu in Irrigation Office.
राज्यातील दंगलींची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी

राज्यमंत्री कडू एका न्यायालयीन खटल्यासंदर्भात आले होते. सकाळी लवकर पोहोचल्याने त्यांनी हातात असलेल्या वेळेचा सदउपयोग करीत त्यांनी सिंचन भवन गाठले आणि तेथील आवक, जावक रजीस्टर, फत्रव्यावहारांची थेट रजीस्टर घेऊन तपासणी सुरु केली. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी सगळ्यांचीच धावपळ उडाली.

State minister Bachhu Kadu in Irrigation Office.
अमरीशभाई पटेल म्हणाले `मला २५० हून अधिक मते मिळतील`

रजीस्टर तपासताना ते म्हणाले, ऑफीस कसं काम करतय हे दिसतय. यातील अनेक कॅालम हे रिकामे सोडले आहेत. सर्व कॅालम खाली (रिक्त) आहेत. कोण पाहते हे. कोणाची जबाबदारी आहे ही. अहो तुमचंच काम आहे ना?. ऑफीस कसे चाललय ते पाहण्याची जबाबदारी घ्या. शासन निर्णय काय आहे?. त्याचे पत्र नाही आहे. पत्रावर ५ फेब्रुवारीची तारीख आहे. कार्यवाहीला एव्हढा विलंब का?. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे पत्र आहे. त्यांच्या पत्रावर काय कारवाई झाली?. उत्तर दिले त्या पत्रावर तारीखच नाही. कोणत्या विभागाशी संबंधीत विषय आहे हा. जर मंत्र्यांच्या पत्राची ही स्थिती तर कसे होणार?. त्यांच्या उलट तपासणीने अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.

काहीही खोटं बालू नका!

राज्यमंत्री कडू यांनी विविध पत्रव्यावहार तपासताना त्यावरील ताशेरे व तारखा पाहिल्या. अनेक पत्रांवर तारीख नाही. तारखेविना पत्र पाठवता खसे असा प्रश्न त्यांनी केला. अधिकाऱ्याला प्रत्यक्ष पत्र दाखवून १७ ऑगष्टला पत्र आले. नंतर २४ ऑगष्टला पत्राचे उत्तर दिले. सात दिवस लागले. काय कारण आहे?. तारखेला आले. सेवा हमी कायद्याचे उल्लंघन झाले. हे तपासून घ्या. यासंदर्भात सेवा हमी कायद्याचा फलक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावावा, अशी सूचना करून त्यांनी रिक्त पदांचीही माहिती घेतली.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com