Sanjay Raut Vs Chhagan Bhujbal : 'हनुमान चालीसा'चा आवाज..; राऊतांनी भुजबळांना सुनावलं, तर राणांना खोचक टोला

Sanjay Raut criticizes Minister Chhagan Bhujbal for lowering the volume of Hanuman Chalisa : नाशिकमधील एका कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांनी हनुमान चालीसाचा आवाज कमी करण्याच्या घटनेवर संजय राऊत यांची टीका.
Sanjay Raut Vs Chhagan Bhujbal
Sanjay Raut Vs Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री छगन भुजबळांनी एका कार्यक्रमादरम्यान हनुमान चालीसाचा आवाज कमी करण्याच्या मुद्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चांगलं सुनावलं.

तसंच खासदार राऊतांनी या घटनेवर अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांचं नाव न घेता डिवचलं. महायुतीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना देखील या घटनेची दखल घ्यावी, अशी मागणी खासदार राऊत यांनी केली.

नाशिकमधील एका कार्यक्रमात हनुमान चालीसा सुरू होती. या कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ सहभागी झाले होते. यावेळी मंत्री भजुबळ यांनी हनुमान चालीसाचा आवाज कमी करण्यास सांगितलं. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना चांगलच सुनावलं आहे. मंत्री भुजबळ यांच्या या कृतीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देण्याची गरज आहे, असं राऊतांनी डिवचलं.

Sanjay Raut Vs Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : भाषणावेळी लागली हनुमान चालिसा; भुजबळ पोलिसांना म्हणाले, आवाज कमी करा नाहीतर...

खासदार संजय राऊत यांनी अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना देखील त्यांचं नाव न घेता खोचक टोला लगावला. अमरावतीतील हनुमान चालीसावाल्या बाईंनी नाशिकमध्ये पोचायला हवं, असा टोला लगावत डिवचलं. त्यांनी नाशिकला पोचून भुजबळांसमोर हनुमान चालीसा म्हणावी, असाही सल्ला दिला.

Sanjay Raut Vs Chhagan Bhujbal
Kopargaon Assembly Constituency : अजितदादांच्या डेअरिंगवर आमदार काळे-कोल्हेंच्या मतदार संघात रंगलीय चर्चा...

राज्यात अनेक बेकायदा गोष्टी सुरू आहे. मंत्री भुजबळ आता कोणत्या पक्षाशी निगडीत आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत दाखवणार का? असा प्रश्न करताच राज्यात शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, याबाबत संजय राऊत यांनी इशारा दिला.

नाशिक शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करून बडगुजर कुटुंबियांना त्रास देण्याचा प्रकार थांबवण्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला. राज्यात अनेक ठिकाणी शिवसैनिकांविरोधात कायद्याचा गैरवापर होत आहे, त्याची आम्हाला दखल घ्यावीच लागलेच, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com