Nashik Politics : बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. काल नाशिकमध्ये या संदर्भात बंद पुकारण्यात आला. त्यावरून शहरात अशांतता निर्माण झाली होती.
या दंगली संदर्भात भाजप नेते मंत्री गिरीश महाजन सायंकाळी नाशिकला आले होते. यावेळी त्यांनी एक धक्कादायक विधान केले. या विधानामुळे पोलिसांच्या कामकाजाबाबतही प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आता त्यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेला बंद आणि काढण्यात आलेली रॅली याविषयी चर्चा केली. यावेळी त्यांनी जुने नाशिक (Nashik) भागात दुकाने बंद करण्यावरून वाद झाला. त्यात एक गट आक्रमक झाल्याचा आरोप केला. मंत्री महाजन यांनी पोलिसांच्या कामकाजाबाबतही माहिती घेतली. महाजन यांनी या दंगलीत खासगी बंदुकीचा वापर झाला, असे विधान केले. त्यामुळे नागरिकांत देखील खरोखरच, अशा प्रकारे खाजगी बंदुकीचा वापर झाला का? याची चर्चा सुरू झाली.
पोलिसांकडून मात्र याबाबत कुठलाही दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे जी माहिती पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणांना नाही, ती मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना कोणत्या सोर्सने मिळाली? हा गंभीर प्रश्न आहे. यातील सत्यता तपासून पाहणे आणि खरे काय ते जनतेपुढे येणे शहराच्या कायदा व सुव्यवस्था या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आता त्यातील वास्तव पुढे येण्याऐवजी वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे. पोलिसांनी अथक परिश्रम करून कालची दंगल नियंत्रित केली. अन्य सामाजिक संघटना आणि जागरूक नागरिक यांनी देखील अफवांवर विश्वास ठेवला नाही. त्यामुळे समाजकंटकांचा हेतू विफल झाला.
दोन्ही बाजूंच्या जमावाकडून एकमेकांना चिथावणी देणे आणि अफवा पसरविण्याचे काम जोरदार सुरू होते. त्याचा गैरफायदा घेत काही तरुणांची डोकी भडकवण्याचा प्रयत्न दिवसभर सुरू होता. काही घटकांकडून याबाबत आतातायीपणा आणि तणाव निर्माण होईल, अशी कृत्ये झाल्याच्या आरोप आहे.
नाशिक शहर शांत ठेवण्यात पोलिसांना यश आले. त्याचे क्रेडीट पोलिस यंत्रणेतील समन्वय आणि जलद कार्यवाहीला जाते. यामध्ये कोण दोषी? कोण कारस्थानी? हे यथावकाश पुढे येईल. यासंदर्भात शहराच्या विविध पोलिस ठाण्यात सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत आत्तापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्वांना आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पालकमंत्री दादा भुसे काल जिल्ह्यातच होते. त्यांनी सायंकाळी नाशिकमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची चर्चा केली. याबाबत तातडीचे आढावा बैठकही घेण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.