Gulabrao Patil News: मला नशिबानं हे खातं मिळालं..., सगळ्यांना 'पाणी' पाजतो ; गुलाबरावांची मिश्किल टिपण्णी

Jalgaon Politics : हे खातं कुणीच घेत नव्हतं...
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama

Jalgaon News: “मला गुलाबभाऊ नाही, पाणीवाला बाबा व्हायचंय” असे विधान करणारे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्याला मंत्रीपद कसे मिळाले, याचा खुलासा केला आहे. "राज्यात पाणीपुरवठा हे खातं कुणीच घेत नव्हतं. मात्र, मला नशिबाने हे खातं मिळालं," असे गुलाबराव म्हणाले. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सगळ्या गावांना पाणीपुरवठा योग्य होत आहे, "आम्ही शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) अशा सगळ्यांना पाणी पाजतो," असा टोला गुलाबरावांनी लगावला.

Gulabrao Patil
Gadakh Vs Vikhe : गडाख-विखे पुन्हा एकदा लढत ? नगर दक्षिणेतून लोकसभेसाठी आघाडीत गडाखांच्या नावावर एकमत..

"शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पाणी पुरवठा खातं देवाच्या कृपेनं मिळाल्याचंही त्यांनी यापूर्वी सांगितले आहे. "या खात्यातर्फ चांगल्या योजना राबवल्यास नावलौकिक होईल,"असे ते म्हणाले होते.

Gulabrao Patil
Thackeray Group On Ajit Pawar: सत्तेची हाव नाही, मग काकांचा पक्ष का फोडला? अजितदादांच्या विकासाची व्याख्या म्हणजे...

जळगाव येथे विविध विकासकामांच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटलांनी तुफान टोलेबाजी केली. "मंत्री असताना तरी एकच सरकार होते. मात्र आमचं तीनजणांचे सरकार आहे. वरती भाजप, कंबर शिवसेनेचे आणि हातपाय राष्ट्रवादीचे असं चाललं आहे आमचं," असे गुलाबराव पाटील म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गुलाबरावांनी टीका केली. "यापूर्वी हेच राष्ट्रवादीवाले आमच्यावर 50 खोके एकदम ओके म्हणून टीका करत होते. आता अजितदादा आमच्याकडे आले तर यांची बोलती बंद झाली. यांचे आता तोंड उघडत नाही," असे गुलाबराव म्हणाले.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com