Pankaja Munde Politics : माझ्या बाबांचा गणपती दूध पित नव्हता! पंकजा मुंडेंचं सूचक विधान...

Gopinath Munde News BJP Politics Dhananjay Munde latest update : आपल्या अध्यात्मिक आणि धार्मिक श्रद्धेची विज्ञानाशी सांगड घातली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली आहे.
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Pankaja Munde News : राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आपण प्रयागराजला स्नानासाठी जाणार आहोत, असे सांगितले. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मात्र तटस्थ राहणे पसंत केले. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी मुख्यमंत्री निर्णय घेतील असे त्या म्हणाल्या.

स्वामी समर्थ कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या म्हणाल्या, मी श्रद्धाळू आहे, पण अंधश्रद्धाळू नाही. या श्रद्धेमुळेच मला पर्यावरण खाते मिळाले असेल, असे वाटते. मी श्रद्धाळू आहे. याचा अर्थ कशावरही श्रद्धा ठेवत नाही. आपल्या अध्यात्मिक आणि धार्मिक श्रद्धेची विज्ञानाशी सांगड घातली पाहिजे. मी श्रद्धाळू आहे. पण माझ्या बाबांचा गणपती दूध पित नव्हता, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

Pankaja Munde
BJP Politics : अमित ठाकरे आमदार होणार? भाजप राज्यपाल कोट्यातून संधी देणार? मुंबई महापालिकेसाठी भाजप-मनसे युती?

मस्साजोग (बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. हे प्रकरण सध्या सर्वत्र गाजते आहे. या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड यांचा मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी घनिष्ठ संबंध आहे. त्यावरून सध्या राजकारण तापले आहे. आमदार सुरेश धस यांसह विविध नेत्यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, यासाठी दबाव वाढवला आहे.

यावर मात्र मंत्री पंकजा मुंडे यांनी सावध भूमिका घेतली. त्या म्हणाल्या, त्यांचा राजीनामा हा वेगळ्या विषय आहे. देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. हे मी यापूर्वी बोलले आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तरावरील आहे, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

Pankaja Munde
Manipur CM Biren Singh Resigns : मणिपूरच्या CM नीच भडकवला हिंसाचार? कथित ऑडियोमुळे दिला राजीनामा!

फडणवीस गृहमंत्री देखील आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच तपास सुरू आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा विषय मुख्यमंत्र्यांच्याच स्तरावर होईल. त्यावर मी बोलणे उचित नाही, असे मुंडे म्हणाल्या. आपण प्रयागराज येथे स्नानासाठी जाणार आहोत. महाकुंभ मेळा व यात्रेच्या निमित्ताने तेथे अनेक साधूसंत आलेले आहेत. त्यांच्याही भेटी घेणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com