Radhakrishna Vikhe Patil on adulterated milk : राज्यात दरवाढीसाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक आहे. भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या बालेकिल्ल्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमकपणे आंदोलन सुरू ठेवले आहे. तर दुधाच्या भावाला अडथळा ठरत असलेल्या भेसळीच्या मुद्द्यांवरून महायुती सरकार चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसते. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखेंनीही या विषयावर आक्रमक धोरण स्वीकारले आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना 30 रुपये दर न देणाऱ्या संघावर आणि भेसळखोरांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आणि दूध संघाचे अचानक तपासणी करण्याचे आदेश दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे(Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिले आहेत. तपासणीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेणार नसल्याचेही मंत्री विखे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट केले.
नगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सरकारच्या निर्णयाप्रमाणे दूध दर तसेच दुधभुकटी अनुदान योजना तसेच जिल्हास्तरीय दूध भेसळ समितीच्या आढावा बैठकीl घेतली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले(Shivaji Kardile), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीस सहकारी दूध उत्पादक संघ व खासगी दूध प्रकल्पाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी केंद्राकडे कडक कारवाई करण्याची शिफारस करत दूध भेसळखोरांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला आहे. या पाठोपाठ मंत्री राधाकृष्ण विखे आक्रमक झाल्याने दुधातील भेसळखोरांचे धाबे दणाणलेत. दूध भेसळ रोखण्यासाठी आणि दूध भेसळखोरान विरुद्ध कारवाई करण्यासाठी प्रशासनाला त्यांनी पथक कठीण करून कारवाई करण्याचे आदेश दिलेत.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नगर जिल्ह्यातील प्रत्येक दूध संकलन केंद्रावर उच्चप्रतीच्या दुधाचे संकलन करण्यात यावे. दुधाच्या गुणवत्तेमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट करत जिल्ह्याचा उत्तर व दक्षिण विभागामध्ये दुधाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी पथक गठित करण्यात येऊन त्यांच्यामार्फत दुधाची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.
तपासणीमध्ये दुधामध्ये भेसळ आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच दुधसंकलन केंद्रावर दूध देणाऱ्या शेतकऱ्यांना 30 रुपये प्रतीलिटर दर देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. जे केंद्र शेतकऱ्यांना 30 रुपयांचा दर देणार नाहीत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश देत प्रत्येक दूध संकलन केंद्रावर संकलित होणाऱ्या दुधाची माहिती मिळावी यासाठी विशेष ॲप तयार करण्याच्या सूचनाही पालकमंत्री विखे यांनी यावेळी दिल्या.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.