Radhakrishn Vikhe News : म्हसोबाच्या साक्षीनं मंत्री राधाकृष्ण विखेंनी सांगितले, 'राम शिंदे अन् मी...'

Political News : आमदार राम शिंदे आणि आमच्‍या कोणतेही मतभेद नसून, पुढील सर्व निवडणुका आम्ही एकत्रितपणेच लढविणार आहोत, असे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.
Radhakrishna Vikhe Patil, Ram Shinde
Radhakrishna Vikhe Patil, Ram Shindesarkarnama

Nagar News : भाजपचे स्टार प्रचारक तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी माजी पालकमंत्री आमदार राम शिंदे यांच्याशी कोणतेही वाद नसल्याचा पुन्हा एकदा उच्चार केला. जामखेडमध्ये महायुती भाजपचे उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित संवाद भेटीचे आयोजन केले होते. "पुढील काळात येऊ घातलेल्या सर्व निवडणुका राम शिंदे आणि आम्ही एकत्रित येऊन एक विचाराने लढणार आहोत. यासाठी म्हसोबाची साक्ष घेतो", असे मंत्री विखे यांनी सांगितले.

मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishn Vikhe) आणि आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्या उपस्थित शनिवारी जामखेडमधील चुंभळी येथे संवाद भेट कार्यक्रम झाला. जामखेडमधील जामवाडी, तपनेश्‍वर, मुख्‍य बाजारपेठ, शिवाजी नगर, संताजी नगर, सदाफुले वस्‍ती, आरोळे वस्‍ती आणि चुंभळी येथे नागरिकांच्‍या भेटी घेत मंत्री विखे आणि आमदार शिंदे यांनी संवाद साधला. (Radhakrishn Vikhe News)

Radhakrishna Vikhe Patil, Ram Shinde
Devendra Fadnavis: 'दिल्ली'तून बांधली जातेय फडणवीस विरोधकांची मोट? खडसेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा अन्...

केंद्र आणि राज्‍य सरकारने घेतलेल्‍या निर्णयांची माहिती देवून महायुतीच्‍या उमेदवाराला खंबीरपणे साथ देण्‍याचे आवाहन या दोघांनी केले. यावेळी शिवसेना नेते बाबुशेठ टायरवाले, विनायक देशमुख आदी उपस्थित होते.

चुंभळी येथील कार्यक्रम सुरू होताच, उपस्थितांनी आमदार राम शिंदे यांच्‍यावर होत असलेल्‍या अन्‍यायाबाबत प्रश्‍न उपस्थित केला. आमदार शिंदे यांनीच या चर्चेत हस्‍तक्षेप केला. "मंत्री विखे आणि माझ्यामध्‍ये आता कोणतेही मतभेद राहिलेले नाहीत. आपल्‍याला आता महायुतीच्‍याच उमेदवाराचे काम करायचे आहे. या भागातून शंभर टक्‍के मतदान हे महायुतीच्‍या उमेदवारालाच होईल, असे काम करायचे आहे," असे सांगून आमदार शिंदे यांनी लोकांनी उपस्थित केलेल्या विषयावर पांघरूण घातले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याच विषयाचा उल्‍लेख करत मंत्री विखे यांनी जामखेडच्या चुंभळीतील म्हसोबा महाराजांचे देवस्‍थान आहे. त्यासोबतच लोणी बुद्रुक गावाचे ग्रामदैवत सुध्‍दा म्हसोबा महाराज आहेत. या देवस्‍थानांच्‍या साक्षीने सांगतो की, "आमच्‍या दोघांमध्‍ये आता कोणतेही मतभेद नाहीत. यापुढील सर्व निवडणुका आम्ही एकत्रितपणेच लढविणार आहोत. याबाबत कुणीही मनात संभ्रम ठेवू नये", असे मंत्री विखे यांनी सांगितले. मंत्री विखे आणि आमदार शिंदे यांच्या एकत्रित संवाद भेटीचे स्थानिकांनी स्वागत केले.

(Edited By : Sachin Waghmare)

Radhakrishna Vikhe Patil, Ram Shinde
Devendra Fadnavis: 'दिल्ली'तून बांधली जातेय फडणवीस विरोधकांची मोट? खडसेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा अन्...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com