Ahmednagar Lok Sabha Exit Poll : विखेंची भिस्त आता विठुरायावरच! एक्झिट पोलनंतर आत्मविश्वास डळमळला?

Radhakrishna Vikhe In Tension after Exit Poll Takes Darshan at Pandharpur for Victory of Sujay Vikhe Patil : नगर जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही जागा जिंकण्याबरोबरच, राज्या महायुतीच्या 40 जागा निवडून येतील, असा विश्वास भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी पंढरपुरात व्यक्त केला आहे. विखे परिवारानं यावेळी विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेतले.
Radhakrishna Vikhe
Radhakrishna VikheSarkarnama

Ahmednagar Lok Sabha Result 2024 : पुत्र खासदार डाॅ. सुजय विखे यांच्या विजयासाठी विखे परिवारआज सकाळी-सकाळी पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी चरणी लीन झाले. भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुजय विखे मोठ्या मताधिक्यांनी विजय होतील, असा विश्वास व्यक्त केला.

भाजप (BJP) नेते मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, "नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील जनता महायुतीसोबत आहे. त्यामुळे सुजय विखे मोठ्या मताधिक्यांनी विजयी होतील. नगर जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही जागा निवडून येतील. राज्यात महायुतीला 40 पेक्षा जास्त जागा मिळतील. देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला आहे".

मराठा आरक्षणाचा काही परिणाम जाणवेल का? यावर राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) म्हणाले, "मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग्यपद्धतीने न्याय दिला आहे. त्यामुळे त्याचा काहीच परिणाम लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांवर झाला नाही". राज्यातील दुष्काळाची धग कमी होऊन पाऊस-पाणी भरपूर पडू दे, असे साकडे राधाकृष्ण विखे यांनी विठुरायाला घातलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Radhakrishna Vikhe
Radhakrishna Vikhe On Nilesh Lanke : मंत्री विखेंचा लंकेंवर कडक प्रहार; 'भाडोत्री लोकांवर उभा केलाय धंदा, वाईट वाटणारच...'

एक्झिट पोलमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच उमेदवार माजी आमदार नीलेश लंके आघाडीवर दाखवले आहे. महायुतीमधील भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे पिछाडीवर दाखवले गेले. एक्झिट पोलच्या या अंदाजानंतर नगर भाजपमध्ये सन्नाटा पसरला आहे. कोणीही पुढे येऊन प्रतिक्रिया द्यायला तयार नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पुढे येत पुत्र सुजय विखे यांच्या विजयाचे दावे करत आहेत. यामुळे विखे यंत्रणा नगरमध्ये एकटी पडल्याचे सध्याचे चित्र आहे. याशिवाय मंत्री विखे यांचा आत्मविश्वास देखील काहीसा डळमळीत झाला आहे. काही तासांवर निकाल आल्याने काहीशी घालमेल देखील पाहायला मिळत होती. सहाजिक विखे परिवार सुजय विखे यांच्यासाठी विजयाबाबत अस्वस्थ आहे.

मंत्रा राधाकृष्ण विखे परिवारासह आज सकाळीच पंढरपुरात दाखल झाले. अख्खा विखे परिवार विठ्ठल-रुक्मिणी चरणी लीन झाला. सुजय विखे यांच्यासाठी यावेळी साकडे घातल्याचे दिसले. विखे परिवाराच्या चेहरावर काहीसा तणाव होता. दर्शनानंतर तो काहीसा मावळल्याचे दिसले.

Radhakrishna Vikhe
Radhakrishna Vikhe On Balasaheb Thorat : पुत्राची खासदारकी धोक्यात; मंत्री विखे संतापून म्हणाले, 'बाळासाहेब थोरातांना शरम वाटली पाहिजे'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com