Sanjay Savkare Politics: मंत्री संजय सावकारे यांची भर सभेतच धक्कादायक कबुली, म्हणाले...

Minister Sanjay Savkare; Minister Savkare confess, That promise is false-मंत्री संजय सावकारे यांनी मतदारसंघातील नागरिकांना दिले होते खोटे आश्वासन.
Minister Sanjay Savkare
Minister Sanjay SavkareSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Savkare News: राजकारणात मतदारांना आपलेसे करण्यासाठी होणारे प्रयोग नवे नाहीत. अनेकदा लोकप्रतिनिधी चक्क खोटे आश्वासन देतात. काळाच्या ओघात जनतेसमोर येतेच. असाच प्रकार वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या बाबात घडला आहे.

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा भुसावळ येथे उत्कर्ष कलाविष्कार संस्था आणि ओबेनॉल फाउंडेशन यांच्यावतीने सत्कार झाला. यावेळी मोठ्या संख्येने नाट्य क्षेत्रातील कलाकार आणि मतदारसंघातील हौशी कलावंत उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना मंत्री सावकारे यांच्या तोंडातून एक सत्य बाहेर आले.

Minister Sanjay Savkare
Malegaon Politics: समाजवादी चवताळले, म्हणाले, ‘आमदार मौलाना मुफ्ती हे तर तोडपाणी वाले आमदार’

भारतीय जनता पक्षाचे मंत्री सावकारे यांनी आपल्या जळगाव जिल्ह्यातील मतदारसंघात नाट्यगृह बांधण्यात येईल, असे आश्वासन यापूर्वी दिले होते. अनेकदा त्यांनी त्याची पुनरावृत्ती केली होती. मात्र ते सर्व खोटे होते. मी त्यावेळी दिलेले आश्वासन हे एक नाटकच समजावे, अशी धक्कादायक कबुली त्यांनी यावेळी दिली.

Minister Sanjay Savkare
Girish Mahajan Politics: गिरीश महाजन यांची दुहेरी खेळी, एकनाथ शिंदेंना शह अन् अजित पवारांना धक्का!

यावेळी मंत्री सावकारे म्हणाले, मी देखील महाविद्यालयात शिकत असताना नाटकांतून कामे केली. विविध एकांकिकांमध्ये मी अभिनय केला आहे. त्यामुळे मला कलाकारांच्या अडचणी आणि समस्या यांची चांगली जाण आहे.

मतदारसंघात पुरेशी जागा नसल्याने नाट्यगृह उभारणे अवघड होते. मात्र लोकांची अपेक्षा विचारात घेता, मी आश्वासन अनेकदा दिले. ते माझे नाटकच होते. दुसरे काही समजू नये मात्र शहरात पुरेशी जागा नसल्याने नाट्यगृह उभारणे अशक्य आहे. हे मी मान्य करतो मात्र जेव्हा नगरपालिकेचा विस्तार होईल, तेव्हा अधिक जागा उपलब्ध झाल्यावर निश्चितपणे शहरात नाट्यगृहाची उभारणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

जळगाव शहरापेक्षा भुसावळची ओळख सांस्कृतिक शहर म्हणून अधिक आहे. या शहरात अनेक कलावंत आहेत. ते सातत्याने विविध प्रयोग करीत असतात. तुम्ही एखादे नाटक बसवल्यास मला देखील त्यात काम करण्याची संधी द्या, असे देखील ते मिश्किल पणे म्हणाले.

(कै) देविदास गोविंद फलक स्मृती पंधराव्या खान्देश नाट्य महोत्सवात मंत्री सावकार यांचा सत्कार झाला. यावेळी फाउंडेशनचे प्रमुख अश्विनीकुमार परदेशी, उत्कर्ष कलाविष्कार संस्थेचे अध्यक्ष अनिल कोष्टी, मोहन फालक, विश्वनाथ पाटील, प्रमोद धनगर आदी पदाधिकारी होते.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com