BJP Convention : भाजपमध्ये शिस्तीवरून बोंबाबोंब; मंत्री, आमदार आणि प्रमुख नेत्यांची अधिवेशनाकडे पाठ

Leaders along with ministers did not go to the BJP convention : अहमदनगर जिल्ह्यात भाजपने नगर उत्तर आणि शहराचे एकत्रित अधिवेशन राहुरीत घेतले. नगर दक्षिणचे अधिवेशन पाथर्डीत घेतले. परंतु या अधिवेशनाकडे भाजप मंत्री, आमदार आणि प्रमुख नेत्यांनी पाठ ठरवल्याने चर्चेत आले. 
BJP Convention
BJP ConventionSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar BJP News : भाजप पक्ष हा शिस्तीसाठी ओळखला जातो. संघटन कसे असावे हे भाजपकडे पाहून इतर पक्ष देखील आदर्श घेतात. परंतु सत्तेत आल्यापासून भाजपचे संघटनेकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. यातूनच पक्ष संघटनेमध्ये शिथिलता आणि ढिलेपणा आलेला दिसतो. यामुळे पक्षाकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमांना अनेक नेते पाठ फिरवत असल्याचे सध्यातरी चित्र आहे.

अहमदनगर जिल्ह्यात भाजपची उत्तर व नगर शहराचे एकत्रित आणि दक्षिणमध्ये स्वतंत्र अधिवेशन झाले. मात्र या अधिवेशनांकडे मंत्री, आमदार, प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवल्याचे समोर आले. याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होणार असल्याने ह्या प्रकाराची नोंद भाजप प्रदेशने गंभीरपणे घेतली असल्याचे बोलले जात आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपची (BJP) राज्यात जोरदार तयारी सुरू आहे. भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक पातळीवर जिल्हानिहाय अधिवेशन घेण्याच्या सूचना केल्या आहेत. पुणे येथे राज्यस्तरीय अधिवेशन झाल्यानंतर स्थानिक पातळीवर अधिवेशन घेण्याच्या ही भाजपची रणनीती विधानसभेच्या अनुषंगाने आहे. परंतु याच अधिवेशनाकडे मंत्री, आमदार, माजी मंत्री, माजी आमदार आणि भाजपचे प्रमुख नेते पाठ फिरवत असल्याचे समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यात भाजपचे उत्तर आणि नगर शहराचे, असे एकत्रित अधिवेशन झाले. त्यानंतर नगर दक्षिणचे अधिवेशन पाथर्डीमध्ये झाले. या अधिवेशनाकडे भाजपच्या प्रमुख नेत्यांनी, मंत्री, आमदारांनी पाठ फिरवली. यामुळे भाजपच्या पक्ष आणि संघटनेतील शिस्तीला तडा जात असल्याचे ओरड होऊ लागली आहे. 

BJP Convention
Radhakrishna Vikhe : शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, आता सत्ता येतच नसते; मंत्री विखेंनी महाविकास आघाडीला डिवचलं

नगर उत्तर आणि नगर शहराचे एकत्रित अधिवेशन राहुरी येथे झाले. त्यावेळी आजी-माजी आमदार अनुपस्थित होते. भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) आणि प्रदेश पातळीवरील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन झाले. यानंतर भाजपचे नगर दक्षिणचे अधिवेशन काल पाथर्डीत झाले. या अधिवेशनास मंत्री राधाकृष्ण विखे, आमदार राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते अनुपस्थित होते. मंत्री विखे नगर जिल्ह्यातच होते. परंतु पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे ते अधिवेशनाला हजेरी लावू शकलेले नाही. माजी खासदार सुजय विखे यांनी अधिवेशनाला सुरवातीला हजेरी लावली. परंतु ते थोड्या वेळातच तिथून निघून गेले. माजी खासदार विखे अधिवेशनातून अशा पद्धतीने निघून जाण्याची चर्चा होती. 

BJP Convention
Radhakrishna Vikhe Vs Balasaheb Thorat : मंत्री विखेंनी थोरातांना दिले चॅलेंज; साई मंदिरात येणार का समोरासमोर?

पाथर्डीमधील अधिवेशनामध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान झाल्याचा अभिनंदनचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणल्याबद्दल अभिनंदन केले.

माजी मंत्री भागवत कराड यांनी दक्षिण भागात असलेल्या पाचही जागेवर भाजप व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे. विधानसभा निवडणुकीत पक्ष देईल, त्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन केले. आमदार मोनिका राजळे, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यावेळी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com