Ashok Uike News : आमदार अशोक उईकेंचा आदिवासी समाजाकडून निषेध; काय आहे कारण ?

Trambkeshwar and BJP Leaders : नेत्यांच्या विधानांमुळे सामाजात तेढ निर्माण झाल्याचा आरोप
Ashok Uike
Ashok UikeSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : त्रंबकेश्वर येथील १३ मे रोजी घडलेले प्रकरण पोलीस प्रशासन व स्थानिक नागरिकांनी मिटवले होते. त्यातच पुण्यातील हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी मंदिर प्रवेशद्वारावर आंदोलन केले. तुषार भोसले यांनी सामाजिक तेढ निर्माण करणारे विधान केले. अशा वातावरणातच भाजपचे आमदार नितेश राणे व माजी आदिवासी विकास मंत्री, आमदार अशोक उईके यांनी आदिवासी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले.

माजी आदिवासी विकास मंत्री व आमदार अशोक उईके (Ashok Uike) यांच्या विधानाचा आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटना नाशिक जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध केला. याबाबत संघटनेने प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. पत्रकात त्रंबकेश्वर शहरात घडलेल्या घडामोडींचा व त्यानंतर भाजप नेत्यांनी केल्या विधानांचा उहापोह करण्यात आला आहे. तसेच संघटनेने आमदार उईके यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.

Ashok Uike
Jitendra Awhad News : ''सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षासंदर्भात दिलेला निर्णय खोडून काढणार'', निकालाच्या आधारे आव्हाडांचा दावा

त्रंबकेश्वर येथे आमदार अशोक उईके यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी आदिवासी हा जन्मतः हिंदू आहे असे विधान केले. त्यामुळे आदिवासी समाजात (Adivasi)त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे. त्यांच्या या विधानाचा आदिवासी संघटना, आदिवासी समाज बांधव जाहीर निषेध करत आहे. अशोक उईके हे आदिवासी समाजातील गद्दार असल्याची जहरी टीका यावेळी करण्यात आली.

भाजपला (BJP) राज्यघटना मान्य नाही का, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. पत्रकात म्हटले की, भारतीय संविधान कलम ३४२ व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विविध निकालात आदिवासी हा हिंदू नाही हे स्पष्ट केले आहे. तरीही प्रा. असलेले आमदार उईके आदिवासी हा जन्मतः हिंदू आहे असे बोलत आहेत. त्यामुळे भाजपाला आणि त्यांच्या नेत्यांना राज्यघटना, न्यायालयाचे निकालच मान्य नाही का?

Ashok Uike
Khed APMC News : आमदार मोहिते विरोधकांचा एक होण्याचा आणखी एक प्रयत्न खेड बाजार समिती सभापती, उपसभापती निवडणुकीत फसला

भाजपच्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे आदिवसी समाज अडचणीत आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्रकात नमूद केले की, भारतीय संविधानाच्या ५ व्या अनुसूचीतील आदिवासींच्या क्षेत्रात बेकायदा घुसखोरी करून अनुसूचित क्षेत्रातील सामाजिक सलोख्याचे वातावरण खराब केले जात आहे. त्यामुळे त्रंबकेश्वर परिसरात येणारे पर्यटक, भाविकांची संख्या घटली आहे. याचा परिणाम आदिवासींच्या उत्पन्नावर झाला आहे. त्यामुळे भाजपाच्या वरिष्ठांनी आपल्या नेत्यांना आवर घालून त्रंबकेश्वर (Trambakeshwar) परिसरातील शांतता, सामाजिक सलोखा अबाधित राखवा.

या पत्रकावर आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेचे जिल्हाप्रमुख दीपक गांगुर्डे, त्रंबकेश्वर तालुकाप्रमुख अशोक लहांगे, शहराध्यक्ष विलास कोरडे, प्रवक्ते देवा वाटाणे यांची स्वाक्षरी आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com