श्रीगोंदे ( नगर) : श्रीगोंदे शहरातील ग्रामिण रुग्णालयात बसविलेल्या ऑक्सिजन प्लॅंटचे उदघाटन केल्यानंतर तेथील कोनशिलेवर उपस्थितीत नसणाऱ्या मंत्र्यांचे नाव वरच्या बाजूला आणि आमदार बबनराव पाचपुते यांचे नाव खाली टाकल्याने चांगलाच गोंधळ झाला.
विशेष म्हणजे हा प्लॅंट पाचपुते यांच्या विकासनिधीतून असतानाही हा दुजाभाव झाल्याने संतापलेल्या पाचपुते यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या समोरच अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. या अधिकाऱ्यांविरुध्द विधानसभेत हक्कभंग दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
पालकमंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आज ग्रामिण रुग्णालयातील प्राणवायू निर्मिती सयंत्राचे उदघाटन झाले. त्यासाठी आमदार पाचपुते यांनी निधी दिला आहे. मात्र सदर कार्यक्रमाच्या कोनशिलेवर पाचपुते यांचे नाव खालच्या बाजूला टाकले गेले आहे. जिल्ह्यातील एकही मंत्री या कार्यक्रमाला उपस्थितीत नव्हता. मात्र कोनशिलेवर त्यांचे नावे वरच्या बाजूला घेण्यात आल्याने पाचपुते चांगलेच वैतागले.
तेथे उपस्थितीत असणारे उपजिल्हाधिकारी संदीप निचित व जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा यांना बोलावत पाचपुते यांनी संताप व्यक्त केला. चाळीस वर्षे झाले राजकारण करतोय सात वेळा आमदार राहिलो आणि अशा पद्धतीने आम्हाला वागणूक देता का ? माझ्या निधीतून काम केले आणि जे उपस्थितीत नाहीत त्यांची नावे वरच्या बाजूला आणि माझे खाली टाकले हा प्रोटोकाॅल आहे का, असा सवाल केला.
पालकमंत्री मुश्रीफ पाचपुते यांना समजावून सांगत होते मात्र यात तुमचा दोष नाही अधिकाऱ्यांना हे समजत नाही का हे त्यांचे काम आहे असे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान पत्रकारांशी बोलताना पाचपुते म्हणाले, हे जाणीवपूर्वक केले गेले आहे. आपण विधानसभेत या अधिकाऱ्यांविरुध्द हक्कभंग दाखल करणार आहोत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.