धुळे महापालिकेच्या कारभाराची चौकशी करा

आमदार फारूख शाह यांनी विधीमंडळात महापालिकेच्या कामकाजाविषयी तक्रार केली.
MLA Farukh Shah
MLA Farukh ShahSarkarnama

धुळे : महापालिकेत (Dhule city) काही भ्रष्ट अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून जनतेच्या पैशांची उघडपणे लूट सुरू केली आहे. महापालिकेत (Municiple corporation) राजकीय नेते व अधिकारी यांच्या संगनमताने जनतेच्या पैशाचा अपव्यय व गैरव्यावहार सुरु आहे. त्याची चौकशी करावी, अशी मागणी आमदार फारूख शाह (Farukh Shah) यांनी केली आहे.

MLA Farukh Shah
नगरसेवक झाले `माजी`, लेटरहेड, बोधचिन्ह वापरल्यास दाखल होईल गुन्हा?

शहरात निर्माण होणाऱ्या विविध समस्या सोडविण्याबाबत वारंवार सुचना देऊनही काहीही कार्यवाही होत नाही, अशी तक्रार आमदार डॉ. फारूक शाह यांनी विधीमंडळात केली. कोविडसंदर्भात शासनाच्या आदेशाची सर्रास पायमल्ली करून महापालिकेने कचरा संकलन करणाऱ्या वॉटर ग्रेस कंपनीसह या दोन महिन्यात इतर ठेकेदारांची प्रलंबित देयके गैरमार्गाने अदा केली आहेत.

MLA Farukh Shah
आयुक्त पांडे संतापले, चौकीत दारु पिणारे ४ पोलिस सस्पेंड!

याबाबत अनेक नागरिकांसह शिवसेना व मनसेकडून तक्रारी असतानाही मनपा निधीतून काही अधिकाऱ्यांनी आतबट्ट्याच्या व्यवहारातून शासन निर्णय धाब्यावर बसवत देयके अदा केल्याने चौकशी करावी, अशी मागणी आमदारांनी केली. कोरोना संकटकाळात पत्रे, बांबू आदींच्या नावाखाली लाखो रुपयांची हेराफेरी करण्यात आली.

ते म्हणाले, मागील तीन वर्षांतील महापालिकेच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली जावी. याद्वारे जबाबदार अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार शाह यांनी केली. त्यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ कार्यवाहीचा आदेश दिला, अशी माहिती आमदारांनी दिली.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com