नितीन राऊत दौरा; सरोज अहिरेंची ३ तास वेटींग; आमदार खोसकरांना गेटवरच रोखले!

एकलहरे औष्णिक केंद्रातील बैठकीस जाणाऱ्या आमदार हिरामण खोसकर यांना स्थानिक नेत्यांनी अडवले.
MLA Hiraman Khoskar facing local leaders
MLA Hiraman Khoskar facing local leadersSarkarnama
Published on
Updated on

एकलहरे : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांचा गुरुवारी नाशिक औष्णिक वीज केंद्रात (NTPS) पाहणी दौरा झाला. यादरम्यान आढावा बैठकीच्या ठिकाणी स्थानिक नेत्यांना न सोडल्याने त्यांनी आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांना अडवून धरले. आम्हाला प्रवेश नाही तर तुम्हालाही बैठकीला सोडणार नाही, अशी भूमिका घेतली.(Angry local leaders stopped MLA Hiraman Khoskar from meeting)

MLA Hiraman Khoskar facing local leaders
`अहो मिडियाला कळते ते तुम्हाला का कळत नाही`

नाशिक औष्णिक वीज केंद्रात आढावा बैठक सुरू झाली आणि त्या बैठकीच्या ठिकाणी जाण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजाराम धनवटे, माजी पंचायत समिती उपसभापती अनिल जगताप व समिती पदाधिकाऱ्यांना औष्णिक वीज केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच अडविण्यात आले. तुम्हाला सोडता येणार नाही म्हटल्यावर या नेते मंडळीसह पदाधिकाऱ्यांचा पारा वाढला. वीज केंद्रासाठी आम्ही जमिनी दिल्या आणि ६६० च्या प्रश्नी आम्ही मंत्री महोदयांना भेटू इच्छितो तर सुरक्षा यंत्रणा आम्हाला सोडत नाही म्हणजे काय, असा प्रश्‍न त्यांनी या वेळी उपस्थित केला.

MLA Hiraman Khoskar facing local leaders
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय: राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ

या वेळी आमदार हिरामण खोसकर यांचे वाहन आले असता, त्यांना अडविण्यात आले. आम्हाला सोडत नाही तर आम्ही तुम्हाला ही जाऊ देणार नाही, अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी घेतली. श्री. खोसकर यांनी डॉ. राऊत यांच्याशी संपर्क साधल्यावर स्थानिकांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, सुरक्षा यंत्रणेने अनेक अधिकारी तसेच जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाचे अधिकाऱ्यांना ही प्रवेशद्वारासमोर ताटकळत उभे ठेवले. पत्रकारांना सुद्धा येथे मज्जाव करण्यात आला होता.

ताटकळत बसले लोकप्रतिनिधी

दौरा ऊर्जा मंत्र्यांचा आणि वाट पाहण्याची व ताटकाळण्याची वेळ लोकप्रतिनिधींसह, नागरिकांवर आलेली दिसून आली. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा त्रंबकेश्वर तालुक्यासह नाशिक औष्णिक वीज केंद्रात आढावा बैठक नियोजित होती. दुपारी तीन वाजता असणारी बैठक सहा वाजले तरी सुरू झालेली नव्हती. ऊर्जा मंत्र्यांना निवेदन देण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक जमा झाले होते. कंत्राटी कामगार त्याच्या न्यायिक हक्काच्या मागण्यांसाठी पत्र घेऊन वाट पाहत होते.

आमदार सरोज अहिरे यांच्यासह चार गावचे सरपंच व कंत्राटदार मंडळीही साडेसहापर्यंत मंत्री महोदयांची वाट पाहत ताटकळत बसलेले होते. या कालावधीत आमदार अहिरे व सरपंच आदी लोकप्रतिनिधींच्या चहापाणी, अल्पोपाहाराची सोय कंत्राटदार व कंत्राटी कामगारांनी केली. मंत्री महोदयांच्या आगमनानंतर सत्कार, निवेदन देने व प्रकल्पाबाबत चर्चा काही मिनिटात झाली व गंगेत घोडं न्हाल म्हणून सर्वांनी सुस्कारा सोडला.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com