Jaykumar Rawal; आमदार जयकुमार रावल म्हणाले, `मोदी हैं तो मुमकिन है`

गुजरात विधानसभेच्या निकालाचे पक्षाच्या नेत्यांनी जल्लोषात स्वागत केले.
Jaykumar Rawal
Jaykumar RawalSarkarnama

धुळे : गुजरात (Gujrat) विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) मिळविलेला ऐतिहासिक विजय हा गुजरातची जनता विकासासोबतच (Devolopment) असते हे दाखवून देणारा आहे. तसेच ‘मोदी हैं तो मुमकिन है’ (Narendra Modi) अशी प्रतिक्रिया आमदार जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी दिली. (PM Modi is the main factor in Gujrat Assembly election)

Jaykumar Rawal
Burning Bus; अनेकांना बाहर काढले मात्र `त्या` दोघांना वाचवू शकलो नाही!

गुजरातमध्ये भाजपची सलग २७ वर्षे सत्ता असून, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला विकासाच्या नव्या उंचीवर नेल्याचे काम केले आहे. आज गुजरात राज्याचा जो काही विकास झाला आहे तो केवळ एका व्यक्तीवर दाखविलेला विश्वास आणि सलग स्थिर सत्ता यामुळेच झाला आहे.

Jaykumar Rawal
Gujrat merger; दादा भुसेंनी डोळे वटारल्याने गावित गेले भारती पवारांच्या दारी!

ते म्हणाले, गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य आहे. त्यामुळे भाजप, पंतप्रधान मोदी आणि गुजरात यांच्यात अतुट नाते आहे. काल जाहिर झालेल्या निवडणुकीच्या निकालात जवळ जवळ सर्वच जिल्ह्यांत मतदारांनी पक्षावर मतदानातून विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्ट होते. गुजरात पॅटर्नबाबत विरोधकांनी टिकेची झोड उठवली आहे. मात्र मतदारांनी त्याला निकालातून चोख उत्तर दिले.

या वेळी तर गुजरातमध्ये भाजपने यापूर्वीचे सर्वच रेकॉर्ड तोडले असून, १५० पेक्षा जास्त जागा मिळविल्या आहेत. देशात होत असलेल्या विकासाच्या झंझावातावर हे शिक्कामोर्तब असून, याचे सर्वांत मोठे श्रेय पंतप्रधान मोदी यांचे आहे. तसेच गृहमंत्री अमित शहा यांची रणनीती आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गुजरात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांचे कुशल असे संघटन या बळावर हा ऐतिहासिक विजय भाजपने मिळविला असल्याचे श्री. रावल यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com