Gujrat merger; दादा भुसेंनी डोळे वटारल्याने गावित गेले भारती पवारांच्या दारी!

सुरगाण्याच्या गावांचे गुजरातमध्ये विलीनीकरणाच्या प्रश्नावर बैठक घेण्याचे आश्वासन
Dr. Bharti Pawar
Dr. Bharti PawarSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने गुजरात (Gujrat) राज्यात समावेश करावा, अशी मागणी सुरगाणा (Nashik) तालुक्यातील काही गावांनी केली. त्याच्या तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. या प्रश्नावर पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी देखील चिंतामण गावित (Chintaman Gavit) यांना दटावले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केलेले गावित शांत बसायला तयार नाही. त्यांनी आता भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांचे दार ठोठावले आहे. (NCP leader Chintaman Gavit gon to Dr. Bharti Pawar on Gujrat merger issue)

Dr. Bharti Pawar
Burning Bus; अनेकांना बाहर काढले मात्र `त्या` दोघांना वाचवू शकलो नाही!

यासंदर्भात सुरू झालेल्या आंदोलनात पालकमंत्री दादा भुसे यांनी हस्तक्षेप करत या प्रश्नी बैठक घेतली होती. बैठकीत पालकमंत्री दादा भुसे यांनी मूलभूत सुविधा केवळ या गावांना नव्हे तर, सुरगाण्यात तालुक्यात आहे, असे सांगत थेट राष्ट्रवादीचे लेटरहेड झळकविले. त्यामुळे बैठकीत आग्रही मागणी करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित निरुत्तर झाले होते. त्यांना तूर्त आंदोलन स्थगित करावे लागले होते.

Dr. Bharti Pawar
Narendra Modi; देवेंद्र फडणवीसांच्या नाशिक मेट्रोची घोषणा होईल का?

सुरगाणा तालुक्यातील या गावातील मूलभूत सुविधांचा प्रश्न तडीस नेऊन सोडविण्याचा ध्यास असणारे चिंतामण गावित यांनी थेट केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे धाव घेत, सुरगाणाच्या विकासासाठी साकडे घातले आहे. या प्रश्नावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली असून, या प्रश्नी त्यांनी लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले असल्याचे गावित यांनी सांगितले.

गुजरातच्या सीमेलगतच्या सुरगाणा तालुक्यातील विविध गावे, वाडे, वस्त्यांना मूलभूत सुविधा नसल्याने गुजरात राज्यात समावेश करण्याची मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांनी तहसीलदार यांना दिले. त्यानंतर या गावांतील ग्रामस्थांना एकजूट करत तालुका सीमा संघर्ष समितीची स्थापना केली. या प्रश्नावर त्यांनी आंदोलन पुकारले.

पालकमंत्री दादा भुसे यांनी तत्काळ दखल घेत, या समितीला बैठकीसाठी पाचारण केले. यावेळी झालेल्या चर्चेत पालकमंत्री भुसे यांनी गावे गुजरात राज्याला का जोडावी, यासाठी ठोस कारण आहे का अशी विचारणा केली. त्यावेळी चिंतामण गावित कोणतेही ठोस मुद्दा ते देऊ शकले नाही. तालुक्यातच रस्ते, पाणी, आरोग्य व शिक्षणाचा प्रश्न गंभीर असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी सांगत, आमदार नितीन पवार यांच्या समोर गावित यांना निरुत्तर केले. त्यानंतर, या मागणीचा जोर लावणारे याच गावातील ग्रामस्थांमध्येही फूट पडली. त्यावेळी, आमदार पवार यांनी तेथून निघून जाणे पसंत केले. यामुळे गावित काहीसे अडचणीत आले.

सुरगाणा तालुका विकासासाठी प्रसंगी राष्ट्रवादीचा राजीनामा देऊ असे सांगणारे गावित यांनी, तालुक्याचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याशी संपर्क साधला. डॉ. पवार संसदीय अधिवेशन असल्याने दिल्लीत असल्याने गावित यांनी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. यात, तालुक्याच्या प्रश्नांबाबत लवकरच बैठक घेऊ असे त्यांनी सांगितल्याचे गावित यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com