Kiran Lahamate : आमदार लहामटेंची कठोर भूमिका; अजितदादांची महायुतीत झाली कोंडी

Ajit Pawar MLA Kiran Lahamate has expressed his opposition to Dhangar reservation : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील आमदार किरण लहामटे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणावरून वेगळी भूमिका घेतली आहे.
Kiran Lahamate
Kiran LahamateSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : राज्यातील धनगर समाजानं आरक्षणासाठी आंदोलनाचं हत्यार उपसलंय. भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी 10 वर्षांपूर्वी आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यावर कार्यवाही न झाल्यानं आता धनगर समाजानं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू केलं आहे.

मात्र महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटेंनी यावर वेगळीच भूमिका घेऊन अजितदादांची महायुतीत कोंडी केली आहे. विशेष करून आमदार लहामटेंच्या या भूमिकेमुळे अजितदादां आणि भाजप समोरासमोर येण्याची चिन्हं आहेत.

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा अजित पवार (Ajit Pawar) गटाचे अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण लहामटे यांनी दिला आहे. महायुती सरकारने आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये, अशी मागणी किरण लहामटेंनी लावून धरताना, समाजासाठी लढाई लढण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे.

Kiran Lahamate
Dhangar Reservation : पडळकर, शेंडगे शिष्टमंडळाला समाजाची मान्यताच नाही; आता जलसमाधीच...

राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाचा आरक्षणाचा मुद्दा पेटत आहेत. मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आज मध्यरात्रीपासून बेमुदत उपोषण सुरू करत आहेत. धनगर समाजाने बुधवारपासून सात दिवस आंदोलन केल्यानंतर जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महायुती सरकारची एकप्रकारे परिक्षा सुरू झाली आहे. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विशेष अधिवेशन बोलवण्याचे संकेत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना नेत्यांकडून दिले जात आहे.

Kiran Lahamate
Narhari zirwal : 'धनगर आरक्षणाला विरोध नाही पण...' आदिवासी नेत्याने बोलून दाखवली खंत

आमदार लहामटेंकडून निषेध

महायुतीत सत्तेत सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांनी एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देण्यात तीव्र विरोध दर्शवला आहे. किरण लहामटे यांनी सुरवातीला धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा ज्यांनी कोणी निर्णय घेतला, त्याचा निषेध केला.

घटनेची कोणीही पायमल्ली करू नका

आमदार लहामटे म्हणाले, "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आदिवासी समाजाला घटनात्मक आरक्षण दिले आहे. यात 47 जमातींना आरक्षण दिले असून यात कोणाचाही समावेश होऊ शकत नाही. त्यामुळे घटनेची कोणीही पायमल्ली करू नका. धनगर समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर स्वतंत्र द्या". सरकारने आदिवासी समाजाला कायदा हातात घ्यायला लावू नये. धरणासाठी जमिनी दिल्या. आमचं शोषण झालं. घटनेनं आम्हाला जे आरक्षण दिलं आहे, त्यावर जर इतरांचा डोळा असेल, तर ते चालणार नाही, असेही लहामटे यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com