आमदार कुणाल पाटलांना मिळाला तालिका अध्यक्षपदाचा मान

विधिमंडळात हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी आमदार कुणाल पाटील यांनी चालविले कामकाज
MLA Kunal Patil

MLA Kunal Patil

Sarkarnama

Published on
Updated on

धुळे : मुंबईत विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter session) काल सुरू झाले. यात धुळे ग्रामीणचे (Dhule rural) आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांची विधीमंडळाच्या तालिकाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज पाहण्याची जबाबदारी तालिकाध्यक्षांवर असते. त्यात काँग्रेसतर्फे पाटील यांची या पदावर शिफारस करण्यात आली.

<div class="paragraphs"><p>MLA Kunal Patil</p></div>
अधिकारी मॅनेज करून आमदार माणिकरराव कोकाटेंचे पॅनेल जिंकले?

प्रत्येक पक्षाकडून विधानसभेतील अभ्यासू आमदारांची त्यासाठी निवड केली जाते. काँग्रेसचे विधिमंडळातील नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पक्षातर्फे तालिका अध्यक्ष म्हणून आमदार पाटील यांच्या नावाची घोषणा केली.

प्रत्येक अधिवेशनात तालिकाध्यक्षपदी विविध आमदारांची अनुभव आणि ज्येष्ठतेनुसार संबंधित पक्षाचे विधिमंडळ नेते शिफारस करत असतात. त्यानुसार ही निवड होत असते. मुंबईत सुरु झालेले हिवाळी अधिवेशन २८ डिसेंबरपर्यंत चालेल. बुधवारी पहिल्याच दिवशी आमदार कुणाल पाटील यांना तालिकाध्यक्षपदाचा मान देण्यात आला. राज्याच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून आलेले आमदार पाटील यांनी पहिल्याच दिवशी कामकाज चालविण्याची संधी साधली.

<div class="paragraphs"><p>MLA Kunal Patil</p></div>
गृहमंत्र्यांनी `या`साठी केले चोपडाच्या सहकारातील नेत्यांचे कौतुक!

प्रश्‍नोत्तराच्या कामकाजात ऊर्जा विभागाच्या प्रश्‍नावर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधारी पक्षांचे निवडणुकीतील जाहीरनामे सभागृहात दाखवून मोफत विजेचे आश्‍वासन दिले असल्याचे सांगितले. त्यावर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी प्रत्युत्तरात देशातील इतर नेत्यांनी कशी आश्‍वासने दिले याविषयी माहिती दिली. त्यावर देशातील इतर नेत्यांनी कशी आश्‍वासने दिली हे सांगताच सभागृहात विरोधी पक्षांनी गदारोळ सुरु केला.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचे जाहीर केले आणि भाजपच्या आमदारांनी घोषणाबाजी सुरु केली. त्यावेळी तालिकाध्यक्ष श्री.पाटील यांनी संयमाने कामकाज हाताळले आणि राज्यातील शेतकऱ्यांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विजेच्या प्रश्‍नावर ऊर्जामंत्र्यांचे उत्तर महत्त्वाचे आहे, ते उत्तर होऊ द्या, असे सांगत कामकाज पुढे रेटले. नंतर काही वेळ कामकाज स्थगित झाल्यानंतर पुन्हा सुरु झाले. तेव्हा तालिकाध्यक्ष आमदार पाटील यांनी कामकाज यशस्वीपणे सांभाळले. एप्रिल २०२१ मध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. आता २०२१ मध्येच त्यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदावर आपले स्थान जमवले आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com