जळगाव : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) कार्यरत झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंगेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना धक्के देणे सुरू केले आहे. खडसे यांच्या पत्नी चेअरमन असलेल्या जिल्हा सहकारी दूध संघावर प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. मुख्य प्रशासक म्हणून गिरीश महाजन यांचे निकटचे सहकारी भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी आज पदभार स्वीकारला. त्यांच्या समवेत प्रशासक मंडळाचे सदस्य अरविंद देशमुखही होते. (MLA Mangesh Chavan accepted post of administrator of Jalgaon District Milk Sangh)
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे वर्चस्व आहे. त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे संघाच्या चेअरमन आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सरकारने संचालक मंडळ बरखास्त केले. त्या ठिकाणी प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे. याबाबतचे आदेश सरकारने नुकतेच जारी केले आहेत. प्रशासक मंडळातील काही सदस्यांनी शुक्रवार (ता. २८ जुलै) मध्यरात्री जिल्हा दूध संघात जाऊन प्रशासकपदाचा ताबा घेतला होता, त्यामुळे बराच वादंग झाला होता.
जळगाव जिल्हा दूध संघाचे मुख्य प्रशासक व चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आज दुपारी जिल्हा दूध संघात जाऊन मुख्य प्रशासक पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. या वेळी प्रशासक मंडळाचे सदस्य अरविंद देशमुख, राजेंद्र राठोड, अमोल शिंदे आदी उपस्थित होते. आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, आपण मुंबई येथे असल्यामुळे प्रशासकपदाचा ताबा घेऊ शकलो नाही. आमच्या काही सदस्यांनी शुक्रवारी हा ताबा घेतला होता. मात्र, आज आपण जळगाव येथे हजर होवून मुख्य प्रशासकपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. आपण या वेळी शेतकरीहिताचे निर्णय घेणार आहोत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
आमदार मंगेश चव्हाण हे भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. चाळीसगाव मतदारसंघातून आमदारकीची उमेदवारी देण्यात गिरीश महाजन यांचा मोठा वाटा आहे. सहकार क्षेत्रात आमदार मंगेश चव्हाण हे क्रियाशिल आहेत. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्षाची संपूर्ण धुरा त्यांनीच सांभाळली होती. त्यावेळी यशस्वी माघार घेण्याचा निर्णयही त्यांनीच घेतला होता. जिल्हा सहकारी दूध संघाचा मुख्य प्रशासक म्हणून सहकार क्षेत्रात काम करण्याची त्यांना संधी मिळाली आहे. दूध संघाच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.