MLA Sanjay Savkare
MLA Sanjay SavkareSarkarnama

आमदार संजय सावकारेंनी महावितरणच्या अधिकाऱ्यांचे कान टोचले!

महावितरणकडून शेतकऱ्यांना अवाजवी व भरमसाठ बिले आकारून वीज कनेक्शन तोडण्यात येत आहेत.

भुसावळ : महावितरणकडून शेतकऱ्यांना अवाजवी व भरमसाठ बिले आकारून वीज कनेक्शन तोडण्यात येत आहेत. ( mahavitaran charges heavy bills & cuts power supply)अस्मानी संकटामुळे परेशान असलेल्या शेतकरी बांधवावर होत असलेला कोणताही अन्याय कदापि सहन करण्यात येणार नाही. वीज कनेक्शन कोडणे बंद करावे अन्यथा राज्य सरकारला झटका देऊ, असा इशारा आमदार संजय सावकारे (MLA Sanjay Savkare) यांनी दिला.

MLA Sanjay Savkare
जिवलग मित्राच्या भेटीने शरद पवारही भारावले!

तालुक्यातील शेतकऱ्यांना महावितरणतर्फे अवाजवी वीज बिले आकारण्यात येत असून दोन- दोन महिने वीज डीपीची दुरुस्ती करण्यात येत नाही. तसेच मीटर रीडिंगनुसार वीज बिले न आकारता अवास्तव बिले आकारून शेतीचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना आमदार संजय सावकारे यांच्याकडे मांडल्या असता आमदार सावकारे यांनी महावितरण कंपनीचे कार्यालय गाठून कार्यकारी अभियंता घारुडे तसेच श्री. धांडे व श्री. भंगाळे या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांच्या समस्या मांडत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

MLA Sanjay Savkare
संजय राऊत तुम्ही महाविकास आघाडीचे शिल्पकार, शिल्पाला ओरखडा जाऊ देऊ नका!

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. त्यातच त्यांना महावितरणतर्फे होत असलेल्या त्रासाबद्दल आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने नैसर्गिक कारणांनी किंवा चोऱ्यांमुळे बंद पडलेल्या वीज डीपीची दुरुस्ती करावी. नादुरुस्त मीटर बदलून सरासरी बिले न देता रीडिंगनुसारच वीज बिल मिळावे. डीपी बंद असतानासुद्धा शेतकऱ्यांना दिलेली बिले रद्द करण्याची मागणी आमदार संजय सावकारे व उपस्थित शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे केली. यावर वरिष्ठांशी बोलून लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष परिक्षित बऱ्हाटे, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र पुंडलिक चौधरी, साकेगावचे माजी सरपंच अनिल पाटील, किसान मोर्चाचे कैलास झोपे, संजय पाटील व शेतकरी उपस्थित होते.

एकीकडे अतिवृष्टीमुळे महाविकास आघाडी शासन म्हणते की, आम्ही कोणत्याही शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडणार नाही आणि दुसरीकडे त्यांच्याच महावितरणकडून शेतकऱ्यांना अवाजवी व भरमसाठ बिले आकारून वीज कनेक्शन तोडण्यात येत आहेत. अस्मानी संकटामुळे परेशान असलेल्या शेतकरी बांधवावर होत असलेला कोणताही अन्याय कदापि सहन करण्यात येणार नाही.

- संजय सावकारे, आमदार.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com