NCP Saroj Ahire News: सरोज अहिरे यांचे दोन्ही डगरीवर हात!

NCP Political Crisis: म्हणतात मी सही केली, शपथविधीला होते, मात्र अजुन निर्णय घेतलेला नाही.
Saro Ahire
Saro AhireSarkarnama
Published on
Updated on

NCP Saroj Ahire News: मी खुप भावनीक आहे. मला खुप धक्का बसला आहे. मी अजित पवार यांच्या समर्थनार्थ पत्रावर सही केली आहे. शपथविधीलाही हजर होते. मात्र अजुन निर्णय घेतलेला नाही. इतर आमदारांप्रमाणे मी देखील चर्चा करून निर्णय घेणार आहे, असे देवळाली मतदारसंघाच्या, राष्ट्रवादी काँग्रेसत्या आमदार सरोज अहिरे यांनी सांगितले. (NCP MLA Saroj Ahire didn`t kept suspense on her role on NCP split)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) फोन बंद केलेल्या आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यांनी मी मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांची भूमिका विचारात घेऊन निर्णय घेईन. जनता सांगेल, तो निर्णय घेईन.

Saro Ahire
Chhagan Bhujbal : कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळेच राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाली

त्या म्हणाल्या, अजित पवार राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते आहेत. सगळ्या आमदारांनी केल्या त्याप्रमाणे मीही नेत्यांचा आदेश समजून त्या पत्रावर स्वाक्षरी केली. मात्र जेव्हा मला खरे वास्तव लक्षात आले. त्यामुळे मला मानसिक धक्का बसला असून मी रुग्णालयात उपचार घेत आहे. अजूनही मी कन्‍फ्युज असून मतदारांना विचारुन मगच माझा निर्णय जाहीर करेन.

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात अजित पवार यांनी बंड केल्याने अजूनही राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्याप्रमाणे आमदारही संभ्रमावस्‍थेत आहे. सरोज आहिरे यांनी गंगापूर रोड येथील एका रुग्णालयात आज पत्रकार परिषद घेउन त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यात अजूनही कुंपनावरच असल्याचेच स्पष्ट झाले.

Saro Ahire
Amol Mitkari यांचा ऑडिओ कॉल वायरल | viral audio | beed NCP | Sarkarnama video|

श्रीमती आहिरे म्हणाल्या की, पक्षातील घटनेने मला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. आधीच मी आजारी असतांना अशातच आमच्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात अजित पवार यांनी सवतासुभा रचित पक्षातून वेगळे होण्याची भूमिका घेतल्याचे ऐकून मला मानसिक धक्का बसला आहे. या धक्क्यातून बाहेर पडायला वेळ लागणार आहे. रुग्णालयात मी उपचार घेत आहे. माझ्या हाताचे ऑपेरेशन आहे, त्यामुळे दोन दिवस कुणाच्या संपर्कात नव्हते, मी शरद पवार आणि अजित पवार दोघांना भेटले, माझी बाजू सांगितली आहे.

अहिरे यांनी वाढवला गोंधळ

दरम्यान आता पक्षातील गटबाजीचे नेमके चित्र स्पष्ट झाल्याने आता कुणाबरोबर जाणार? याविषयी श्रीमती आहिरे यांनी मानसिक धक्क्यात असल्याचे सांगत संभ्रमित अशीच भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की, मतदारसंघात गेले एक वर्ष काम करण्यास, निधी मिळवण्यात त्रास झाला, निधी रद्द ही झाला. सत्ता नसल्याने विकास कामे करण्यात प्रचंड अडचणीशी मी सामना केला आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी अजित दादा सोबत जायचे की विश्वासाला पात्र ठरण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत जायचे याविषयी मी कुठलाही निर्णयाप्रत आलेली नाही.

Saro Ahire
Amol Mitkari यांचा ऑडिओ कॉल वायरल | viral audio | beed NCP | Sarkarnama video|

म्हणून केली सही...

अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देण्यासाठी जे पत्र दिले आहे. त्यावर सरोज आहिरे यांचीही स्वाक्षरी असल्याने त्यांविषयी विचारले असता, त्या म्हणाल्या की, मी सही केली होती, राजभवनला ही गेलेले, सही केली तेव्हा मला काहीही माहीत नव्हते. असा दावा करीत त्या म्हणाल्या की, अजित पवार आमच्या पक्षाचे नेते आहे. त्यामुळे नेत्यांनी सांगितल्यानुसार आमदार सही करतात तशी मी सही केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com