आता आमदारांनीच भाजप नगरसेवकांचे पक्षांतर रोखावे!

प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत मुंबईत महापालिका निवडणुकीचा आढावा
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : महापालिका (NMC) निवडणुकीपूर्वी भाजपने (BJP) शहरात केलेल्या सर्वेक्षणात फिफ्टी प्लस जागा निवडून येण्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. नाराज नगरसेवकांनी पक्षांतर करू नये यासाठी आमदारांनी त्यावर लक्ष ठेवावे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी १५ ते १६ नगरसेवक कमी पडल्यास त्यासाठी काय रणनीती आता येईल, याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिल्या.

Chandrakant Patil
गडकरींनी पुरस्कारासह ५ लाखांचा निधी संकटग्रस्त कांदा शेतकऱ्यांसाठी दिला!

भाजपच्या नाराज नगरसेवकांना रोखण्यासाठी आमदारांकडे जबाबदारी देण्यात आली असून, ज्या विभागामध्ये ताकद कमी आहे त्या विभागात रणनीती आखण्यास सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Chandrakant Patil
जिल्हा परिषदेची निवडणुक भाजप स्वबळावर लढणार!

महापालिका निवडणुकांबाबत अनिश्चितता असली तरी साधारण मार्चच्या मध्यावर महापालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्‍यता आहे. एकीकडे राज्य निवडणूक आयोगाने तयारी केली असताना दुसरीकडे राजकीय पक्षदेखील कामाला लागले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांची गुरुवारी मुंबईत बैठक बोलावण्यात आली. नाशिकचे प्रभारी जयकुमार रावल, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, महापौर सतीश कुलकर्ण, स्थायी समिती सभापती गणेश गिते, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे आदी उपस्थित होते. बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला.

भाजपकडून निवडणूक पूर्व प्रभागनिहाय सर्वेक्षण घेण्यात आले. त्यात फिफ्टी प्लस अर्थात ५० च्या पुढे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून येतील असा अहवाल सादर करण्यात आला. त्यामुळे ६६ चा सत्तास्थापनेचा जादुई आकडा गाठण्यासाठी काय रणनीती आता येईल, याबाबत चर्चा झाली. शिवसेनेने हंड्रेड प्लसचा नारा दिला असला तरी सर्वेक्षणात भाजपपुढे असल्याने फारसे चिंतेचे नाही. मात्र, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असलेले भाजपच्या नगरसेवकांना रोखण्यासाठी आमदारांकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

ताकद वाढविण्याच्या सूचना

पंचवटी, मध्य नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद आहे. ही ताकद तसेच शाबूत ठेवताना नाशिक रोड व सिडको विभागात शिवसेनेला टक्कर देण्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे. दलित व मुस्लिम मतदारांची संख्या असलेल्या नाशिक गावठाण भागात विशेष नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. सिडको सातपूरमध्ये भाजपचे काही नगरसेवक नाराज असून ते राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यावर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देताना आमदारांकडे जबाबदारी देण्यात आल्याचे समजते.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com