Maharashtra Politics : सत्यजीत तांबे यांनी नाशिकचा नेमका प्रश्न उचलला!

MLC Satyajeet Tambe raise nashik`s correct issue with solution-उद्योग, गुतंवणूक आणि रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नाचा नाशिकच्या लोकप्रतिनिधींना पडला होता विसर
Satyajeet Tambe
Satyajeet TambeSarkarnama

Nashik Politics : उद्योग, गुंतवणूक आणि रोजगाराच्या दृष्टीने नाशिक शहराला सतत जागेचा प्रश्न भेडसावत आहे. त्याबाबत सातत्याने चर्चा होत असते. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींना त्यावरील उपाययोजना सुचल्या नाहीत. आमदार डॉ. सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत या प्रश्नावर चर्चा घडवून आणली. (Ministers as well Representitives missed the important issue of Nashik city)

औद्योगिक जागेच्या (Nashik) कमतरतेचा प्रश्न सोडविण्यासाठी आता एक पाऊल पुढे पडले आहे. (Satyajeet Tambe) सत्यजीत तांबे यांनी लक्षवेधी मांडली होती. राज्य शासनाकडून (Maharashtra Government) वापरात नसलेली एसईझेड प्रकल्पातील इंडिया बुल्सची जागा परत घेण्याची प्रक्रीया सुरू केली आहे.

Satyajeet Tambe
Chhagan Bhujbal: बीडमध्ये दंगल घडविणारी माणसं जरांगेंचीच; भुजबळांचा हल्लाबोल

जिल्ह्यातील अतिरिक्त सिन्नर औद्योगिक क्षेत्र (सेझ) टप्पा क्र. १ येथे इंडियाबुल्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लि. या कंपनीच्या प्रकल्पास दिलेली सर्व जमीन परत घेण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच राज्यातील औद्योगिक वसाहतीमधील विकसित न केलेल्या जमिनी परत घेण्याची कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नुकतीच विधानपरिषदेत दिली.

यासंदर्भात आमदार सत्यजीत तांबे यांनी लक्षवेधी सुचना मांडली होती.उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले की, अतिरिक्त सिन्नर औद्योगिक वसाहतींमध्ये इंडिया बुल्स कंपनीला जमीन वाटप करण्यात आली होती. मात्र, कंपनीने वाटप केलेल्या क्षेत्रामध्ये विकास करण्याची कार्यवाही केली नसल्याने जमीन परत देण्यासंदर्भात त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. एमआयडीसी कायदे व न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही सुरू आहे. तसेच या प्रकल्पामुळे प्रकल्पबाधित झालेल्यांना वाटप करण्यात येणाऱ्या एकूण ४८२ भूखंडापैकी आतापर्यंत २८२ भूखंडाचे वाटप करण्यात आले असून २०० भूखंड वाटपाची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत विधानपरिषद सदस्य सर्वश्री जयंत पाटील, सचिन अहिर, प्रवीण दरेकर आदींनी भाग घेतला.

Satyajeet Tambe
Loksabha Election : तीन राज्यांतील मुख्यमंत्री निवडीत भाजपचा 'महाराष्ट्र पॅटर्न'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com