इच्छुक म्हणतात, भाजप-मनसे युती हाच पर्याय!

युतीच्या चर्चेबाबत भाजपचे कानावर हात तर मनसेच्या इच्छुकांत चलबिचल
Raj Thakre
Raj ThakreSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : महापालिका (NMC) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) युतीबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून दुजोरा दिला जात नसला तरी, चर्चेमुळे दोन्ही पक्षाच्या इच्छुकांत मात्र चलबिचल सुरू झाली आहे.

Raj Thakre
हे तर पोलिसाचं राज्य! आमदाराच्या अटकेवरून न्यायालयानं सरकारला झापलं

महापालिका निवडणुकांचा घोळ मिटलेला नाही. इतर मागासवर्गीय आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. पुढील ४ मे तारीख पडली आहे. त्याचवेळी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विविध राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा होत आहे.

Raj Thakre
मेवानींच्या अटकेच्या वादाचे मुंबईत पडसाद; काॅंग्रेस नेते राजभवनावर

भोंग्यापासून तर अयोध्येपर्यंत विविध मुद्द्यांवर वातावरण तापले आहे. प्रशासकीय राजवटीमुळे मुंबई, नाशिकसह निवडणुका होणार असलेल्या शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय पक्षांना इच्छुक, तर इच्छुकांना कार्यकर्ते आणि मतदार सांभाळण्यासाठी कसरत करावी लागते आहे. या सगळ्या वातावरणात काही दिवसांपासून भाजप आणि मनसे एकत्र येऊन महापालिका निवडणूका लढविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दोन्ही राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी याविषयी अधिकृत कुठलीही घोषणा केलेली नसली तरी शक्यता नाकारता येण्यासारखी स्थिती नसल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

भाजपला तुल्यबळ नेत्यांची गरज

आगामी निवडणुकांत दोन्ही पक्षात युती झाली तर, दोन्ही पक्षासाठी निवडणुकीत युतीचे गणित लाभदायक ठरणार असल्याने इच्छुकांत उत्सुकता आहे. नाशिक महापालिकेचा विचार केला तरी भाजपचे ६४ व मनसेचे ५ नगरसेवक होते. महापालिकेत सत्ता असली तरी राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ तसेच शिवसेनेचे बहुचर्चित नेते संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांशी प्रचारकी आव्हान देण्यासाठी भाजपला तुल्यबळ नेत्यांची गरज लागणार आहे.

भाजपच्या काही नगरसेवकांनी शिवसेनेशी संधान साधले आहे. अशा स्थितीत मनसेसोबत आल्यास भाजपला लाभ होईल. तसेच, शिवसेनेने काही दिवसांपासून नाशिकचा बुरूज भक्कम केला आहे. अनेक जुने जाणते पदाधिकारी पुन्हा शिवसेनेत आले आहे. तसेच सर्वाधिक इच्छुक शिवसेनेच्या उमेदवारीसाठी रांगेत असल्याने इच्छुकांच्या भाऊगर्दीत नशीब आजमावण्यापेक्षा युती झाल्यास इच्छुकांना मनसे- भाजप युती हा समर्थ पर्याय असणार आहे. हेही एक कारण आहे. आज दिवसभर या चर्चेने इच्छुकांत मात्र चांगलीच चलबिचल होती.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com