MNS accuses BJP of ignoring local issues: शिवसेना आणि मनसेचे एकत्र येण्याचे ठरले. त्याला नाशिक मधून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या बैठकीनंतर मंगळवारी मनसेच्या कार्यालयात दोन्ही पक्षांच्या समर्थकांची बैठक झाली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आक्रमक होण्याचा संदेश देण्यात आला.
राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची अधिकृत घोषणा केली. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये दोन्ही पक्षांचे समर्थक सक्रिय झाले आहेत. राज्य शासन आणि भारतीय जनता पक्षाच्या गैरकारभाराविरोधक येत्या १२ सप्टेंबरला महापालिकेतील गैरकारभार आणि शहरातील नागरी समस्यांबाबत महामोर्चा काढण्याचे घोषित करण्यात आले आहे.
राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्ष महापालिकेत देखील सत्तेत होता. मात्र आज शहराची दुरावस्था झाली आहे. शहरात सगळीकडे प्रचंड खड्डे झाले आहेत. विविध भागांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. याला सत्ताधारी भाजप जबाबदार आहे.
भारतीय जनता पक्षाने नाशिकच्या नागरिकांना दिलेली कोणतीही आश्वासने पाळलेली नाहीत. आता पुन्हा ते आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यातील सत्ता आणि पोलिसांचा दुरुपयोग करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचे काम जोमात सुरू आहे. जनतेचा विश्वासघात करून अशाप्रकारे राजकारण करणाऱ्या पक्षाला धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या संदर्भात जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे एकत्रितपणे शक्ती प्रदर्शन करून मोर्चा काढणार आहे. त्यानिमित्ताने आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला या दोन्ही पक्षांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे महायुती आणि विशेषता भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला कसे सामोरे जायचे यावर चिंतन सुरू केले आहे.
मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी यानिमित्ताने भाजपला टार्गेट केले आहे. नाशिक जिल्ह्यात चार मंत्री आहेत. मात्र जिल्ह्याला पालकमंत्री अद्याप मिळू शकलेला नाही. चारही मंत्री मूग गिळून गप्प आहेत. बाहेरच्या जिल्ह्याचा मंत्री (गिरीश महाजन) येऊन झेंडावंदन करून जातो. यातून सरकारला काय संदेश द्यायचा आहे? असा प्रश्न त्यांनी केला. यावेळी त्यांनी जलसंपदा मंत्र्यांवर गंभीर आरोप देखील केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.