Manoj Jarange Patil Agitation: आता मनसे उतरली मैदानात, म्हणाले, शिवरायांची शपथ घेणारे एकनाथ शिंदे गप्प का?, आहेत कुठे!

MNS Dinkar Patil; Now MNS is also in the fray, Dinkar Patil demands an immediate decision on Maratha reservation -मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
Dinkar-Patil-Raj-Thackeray
Dinkar-Patil-Raj-ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Dinkar Patil News: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला आता मनसेच्या नेत्यांनीही समर्थन दिले आहे. हा प्रश्न राज्य शासनाने तातडीने सोडवावा असे पत्र देण्यात आले आहे.

मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील हे देखील आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मैदानात उतरले आहे. त्यांनी मुhttps://www.youtube.com/watch?v=6ClEcvv1ji8ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण हा गंभीर प्रश्न आहे. सरकारने तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे, असे पाटील म्हणाले.

मनसे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले आहे. पूर्वी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना लिखित स्वरूपात आरक्षण देण्याचे मान्य केले होते. सध्या मात्र आंदोलन सुरू झाल्यानंतर एकनाथ शिंदे कुठे आहेत? ते या प्रश्नावर एक शब्दही का बोलत नाहीत? असा सवाल त्यांनी केला.

Dinkar-Patil-Raj-Thackeray
Congress on Maratha reservation: हर्षवर्धन सपकाळ यांचा नितेश राणेंना टोला, म्हणाले, 'आधी आपल्या वडिलांशी बोला'

मराठा समाज हा पिचलेला आहे. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली. पात्र प्रत्यक्षात ते येऊ शकलेले नाही. समाजामध्ये आरक्षण या विषयावर सरकारकडून फसवलं गेल्याची भावना आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे राजकीय भूमिकेतून पाहू नये, असे दिनकर पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

यापूर्वी अनेकदा जाहीर करूनही मराठा समाजाला आरक्षण मिळालेले नाही. सध्या आझाद मैदानात निर्णायक आंदोलन सुरू आहे. आरक्षण घेतल्याशिवाय समाजबांधव मुंबईहून परतणार नाहीत. त्यामुळे या विषयावर सरकारने आंदोलकांचा अंत पाहू नये.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण देणार असे जाहीर केले होते. अठरा पगड जातींना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी केली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे का गप्प आहेत? प्रश्न सर्वच समाजांना पडला आहे.

स्वराज्यासाठी आणि सर्व जाती धर्मांना न्याय देण्यासाठी आजवर मराठा समाजाने काम केले आहे. आता या समाजावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. या प्रश्नावरून समाजात फूट पडेल असे राज्य सरकार सांगते आहे. त्यामुळे असा विरोधाभास निर्माण करणे ऐवजी राज्य शासनाने हा प्रश्न तातडीने सोडविणे आवश्यक आहे. हे आंदोलन चिघळल्यास त्याचे दुर्गामी परिणाम होतील असा इशारा देखील दिनकर पाटील यांनी दिला.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com